Sunday, June 8, 2025
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

प्रेम संबंधातून खून, आधारकार्डमुळे दुसरा संशयितही ताब्यात..!

Admin by Admin
August 29, 2024
in क्राईम
0
सांगली | खासगी सावकाराची पिता-पुत्रास मारहाण, दहा लाखांसाठी साडेबारा लाखांची पठाणी वसुली
5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जामवाडी परिसरात भरदिवसा अनिकेत तुकाराम हिप्परकर (वय 21) या कबड्डीपटू तरुणाच्या खूनप्रकरणी शहर पोलिसांनी सहाजणांना ताब्यात घेतले. त्यातील चारजण अल्पवयीन आहेत. मुख्य संशयितांच्या नात्यातील तरुणीशी प्रेमसंबंध असल्याचा संशय व वाढदिवसादिवशी झालेल्या भांडणाच्या रागातून हा खून झाल्याचे स्पष्ट झाले.

मुख्य सूत्रधार मंगेश ऊर्फ अवधूत संजय आरते (वय 27, रा. मरगुबाई मंदिरानजीक, जामवाडी) आणि जय राजू कलाल (18 वर्षे 5 महिने, रा. उदय मटण शॉपनजीक, पटेल चौक, सांगली) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. या दोघांना सात दिवसांची कोठडी सुनावली. चार संशयित अल्पवयीन असल्याने त्यांना ताब्यात घेतले. मृत अनिकेत व मुख्य सूत्रधार मंगेश दोघेही जामवाडीतील मरगुबाई मंदिराजवळील गल्लीतले. त्यांच्यात वर्षभरापासून वाद धुमसत होता. मंगेशच्या नात्यातील तरुणीशी अनिकेतचे प्रेमसंबंध असल्याचा संशय होता. तसेच 23 ऑक्टोबर 2023 रोजी मंगेशच्या वाढदिवसादिवशी अनिकेतशी वाद झाला, पण तो वाद मिटविला.

पोलिस ठाण्यापर्यंत मारामारीचे प्रकरण आले नव्हते. महिलेची छेडछाड, व्याजाच्या पैशावरूनही संशयित व अनिकेतमध्ये वाद होता. त्यामुळे मंगेशने अनिकेतचा काटा काढण्याचा कट रचला होता.

मंगळवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या अनिकेत जीमसाठी निघाला असता मरगुबाई मंदिराच्या दारात पाच संशयितांनी त्याच्यावर कोयत्याने हल्ला केला. सपासप वार करीत त्याचा खून केला. हल्लेखोर घटनास्थळावरुन पसार झाले होते.

शहर पोलिस निरीक्षक संजय मोरे यांनी तातडीने संशयितांच्या अटकेसाठी पथके रवाना केली होती. गुन्हे प्रकटीकरण शाखेतील पोलीस अंमलदार संतोष गळवे आणि गौतम कांबळे यांना संशयित कृष्णा नदीकाठ परिसरात लपून बसल्याची माहिती मिळाली. रात्री नदीकाठी पोलिसांनी शोधमोहिम राबविली. पोलिसांना पाहता संशयितांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी पाठलाग करुन सर्वांना जेरबंद केले. या कारवाईत सहाय्यक पोलीस निरिक्षक सागर गोडे, उपनिरिक्षक केशव रणदिवे, महादेव पोवार, प्रमोद खाडे, विनायक शिंदे, सचिन शिंदे, मच्छिंद्र बर्डे, संदिप कुंभार, योगेश सटाले आदींनी भाग घेतला होता.

  • मंगेशच्या सांगण्यावरून हल्ला..

अनिकेतवर जय कलालसह पाच जणांनी कोयत्याने हल्ला केला. त्याच्या डोक्यात दोन, पाठीवर, डोळ्यांवर, कंबरेवर वार करण्यात आले. हे घाव इतके वर्मी होते की, दोन्ही कोयते त्याच्या डोक्यात अडकले होते. त्यातील एक कोयता शवविच्छेदनावेळी कटरच्या सहाय्याने कापून काढावा लागला. पाच संशयितांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी मंगेश आरते याच्या सांगण्यावरून खून केल्याची कबुली दिली.

  • आधारकार्डमुळे दुसरा संशयित अटकेत

खूनातील जय राजू कलाल याला ताब्यात घेतल्यानंतर तो अल्पवयीन असल्याचे सांगत होता. त्यामुळे पोलिसांनी त्याची बालसुधारगृहात रवानगी केली होती. पण त्याचे आधारकार्ड पोलिसांच्या हाती लागले. आधारकार्डावरून त्याचे वय 18 वर्षे 5 महिने असल्याचे सिद्ध होताच पोलिसांनी सुधारगृहातून त्याला ताब्यात घेत अटक केली.

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
Previous Post

महाराष्ट्र हादरला : तलाठ्याच्या डोळ्यात मिर्ची टाकून हत्या..!!

Next Post

‘या’ दोघांना जिल्हा पोलीस अधीक्षकांचा मोठा दणका..!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
वाहनचालकांकडून पैसे उकळल्याप्रकरणी कर्मचाऱ्याचे निलंबन..!

'या' दोघांना जिल्हा पोलीस अधीक्षकांचा मोठा दणका..!

वार्ता संग्रह

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    

ताज्या बातम्या

ब्रेकिंग | भल्या पहाटे सांगलीत थरारक घटना; भाजी विक्रेत्या तरुणाची भररस्त्यात हत्या

ब्रेकिंग | भल्या पहाटे सांगलीत थरारक घटना; भाजी विक्रेत्या तरुणाची भररस्त्यात हत्या

by Admin
June 5, 2025
0

अगदी क्षुल्लक कारणांवरून हाणामारी, खुनाच्या घटना राज्यात ठिकठिकाणी रोज घडत असल्याचे समोर येत आहे. यातच सांगली शहरामध्ये एका भाजी विक्रेत्या...

तीन व्यापाऱ्यांकडून ११ शेतकर्‍यांची ७२ लाखांची फसवणूक, गुन्हा दाखल.

ब्रेकिंग | अनैतिक संबंधाची धमकी; व्यावसायिकाकडे मागितली ३ कोटी खंडणी, स्नेहा नारकरसह पाच जणांवर गुन्हा

by Admin
June 4, 2025
0

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या व्यवसायासाठी कर्ज देण्याच्या बहाण्याने लगट वाढवून अनैतिक संबंधाचा आरोप करण्याची भीती घालत महिलेसह पाच जणांच्या...

मिरजेतील तरुणाकडून पिस्तूल जप्त

मिरजेतील तरुणाकडून पिस्तूल जप्त

by Admin
June 4, 2025
0

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या इस्लामपूर बसस्थानक परिसरात पिस्तूल घेऊन फिरणार्‍या जिलानी मकबुल नरगुंद (वय 27, रा. चांद कॉलनी, मिरज)...

जयश्री पाटील यांची राजकीय दिशा उद्या ठरणार

जयश्री पाटील यांची राजकीय दिशा उद्या ठरणार

by Admin
June 4, 2025
0

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या काँग्रेसच्या बंडखोर नेत्या व जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री पाटील यांच्या उपस्थितीत मदनभाऊ गटातील प्रमुख कार्यकर्त्यांची...

सांगलीत वंचितच्या कार्यकर्त्यांनी खासगी रुग्णालय फोडले, पोलिसांनी १७ जणांना घेतले ताब्यात

सांगलीत वंचितच्या कार्यकर्त्यांनी खासगी रुग्णालय फोडले, पोलिसांनी १७ जणांना घेतले ताब्यात

by Admin
June 4, 2025
0

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या कामगार विमा योजनेअंतर्गत उपचार घेणाऱ्या रुग्णाकडून घेतले जात असल्याचा आरोप करत खासगी रुग्णालयाची प्रचंड तोडफोड...

सांगली ब्रेकिंग | गोपनीय खबऱ्याची पक्की विश्वासू खबर, जिल्ह्यातील ३० पर्यटक जम्मू – काश्मीर मध्ये सुरक्षित..!

ब्रेकिंग | मिरजेत बारमध्ये जोरदार हाणामारी

by Admin
June 3, 2025
0

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या शहरातील विजापूर वेस येथे असणार्‍या एका बारमध्ये जोरदार हाणामारी झाली. बारमध्ये तोडफोडीस विरोध केल्याने दोन...

तीन व्यापाऱ्यांकडून ११ शेतकर्‍यांची ७२ लाखांची फसवणूक, गुन्हा दाखल.

ब्रेकिंग | ‘चारचाकीच्या धडकेतील जखमी वृद्धेचा मृत्यू’; सांगली-मिरज रस्त्यावरील घटना

by Admin
June 1, 2025
0

ADVT. खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या  शहरातील सांगली-मिरज रस्त्यावरील असलेल्या गेस्ट हाऊस परिसरात चालत निघालेल्या वृद्धेला...

राज्यातील ५०० पोलीस निरीक्षकांच्या बदल्या,३०० हून अधिक सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्याही बदल्या

सांगली जिल्ह्यातील ‘पोलिस अंमलदारांच्या बदल्यांचे गॅझेट प्रसिद्ध’: १७८ जणांची बदली; नऊ जणांना मुदतवाढ

by Admin
June 1, 2025
0

ADVT. खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या जिल्हा पोलिस दलातील अंमलदारांना जिल्हांतर्गत बदल्यांचे गॅझेट आज रात्री उशिरा...

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Gopniykhabarya Live 2014

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

© Gopniykhabarya Live 2014

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group