• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

ब्रेकिंग | ‘एपीआय’वर हल्ला, कोयता गँगची पुन्हा दहशत..!

Admin by Admin
August 25, 2024
in क्राईम
0
ब्रेकिंग | ‘एपीआय’वर हल्ला, कोयता गँगची पुन्हा दहशत..!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

महाराष्ट्रात गुन्ह्यांचा आलेख वाढला असताना पुण्यात कोयता गँगने सहाय्यक पोलीस निरिक्षकावरच कोयत्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कोयता गँगच्या हल्ल्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक गंभीर जखमी झाले आहेत.रत्नदीप गायकवाड असे हल्ल्यात जखमी जालेल्या सहाय्यक पोलीस निरिक्षकाचं नाव आहे.

पुण्यातील रामटेकडी परिसरात कोयता गँगच्या गुंडांना पकडण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक रत्नदीप गायकवाड गेले होते. या गुंडाना पकडत असतानाच त्यांच्यावर कोयता गँगने हल्ला केला, त्यामुळे परिसरात खळबळ माजली आहे. या हल्ल्यात जखमी झालेल्या रत्नदीप गायकवाड यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

निहाल सिंग नावाच्या आरोपीने एपीआय रत्नदीप गायकवाड यांच्यावर हल्ला केला. निहाल सिंग हा रेकॉर्डवरील आरोपी असून त्याने याआधीही पोलिसांवर हल्ले केले आहेत, अशी माहिती समोर आली आहे. हल्ल्यावेळी दुसरा आरोपी राहुल सिंगही तिथे होता, तोही रेकॉडवरील आरोपी आहे. या दोघांकडे यापूर्वी अवैध पिस्तुल देखील आढळून आलं होतं.

दोन टोळ्यांमध्ये हाणामारी सुरू असताना एपीआय गायकवाड आरोपींना पकडायला गेले होते, तेव्हा आरोपीने त्यांच्यावरच हल्ला केला. पुण्याच्या रामटेकडी भागात दुपारी साडेचार वाजता ही घटना घडली आहे. कोयता गँगच्या रडारवर पोलीसच आल्यामुळे परिसरात दहशतीचं वातावरण आहे.

याआधीही पुण्यात कोयता गँगने मोठ्या प्रमाणावर धुडगूस घातला आहे. यानंतर पुणे पोलिसांनी त्यांची शहरातून धिंडही काढली होती. पण आता कोयता गँगने थेट पोलिसांवरच हल्ला केल्यामुळे पुन्हा एकदा कायदा सुव्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

Previous Post

भाजपचे माजी जिल्ह्याध्यक्ष व ठेकेदारावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

Next Post

महिलांना मिळणार पाच लाखांची मदत..असा करायचा अर्ज..!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
महिलांना मिळणार पाच लाखांची मदत..असा करायचा अर्ज..!

महिलांना मिळणार पाच लाखांची मदत..असा करायचा अर्ज..!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group