• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मोठी ब्रेकिंग ! भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी बंद दाराआड तासभर चर्चा, जयंत पाटील हसत बाहेर आले..

Admin by Admin
August 25, 2024
in पश्चिम महाराष्ट्र, राजकीय
1 min read
0
मोठी ब्रेकिंग | सांगलीतील राजकारणात भूकंप होणार..! काँग्रेसची ही भूमिका.. म्हणाले, “आम्ही…..!”
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

विशेष प्रतिनिधी – गोपनीय खबऱ्या | आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय पटावर आपले फासे टाकायला सुरुवात केली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये पश्चिम महाराष्ट्रातील भाजपचे अनेक बडे नेते शरद पवार गटाच्या संपर्कात आल्याची माहिती आहे.यामध्ये आज भाजपचे साताऱ्यातील नेते मदन भोसले यांचाही समावेश झाला. शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी रविवारी सकाळी मदन पाटील यांची भेट घेतली.

जयंत पाटील हे मदन भोसले यांच्या घरी गेले होते. याठिकाणी दोन्ही नेत्यांमध्ये तासभर बंद दाराआड चर्चा झाल्याचे समजते. या भेटीत जयंत पाटील यांनी मदन भोसले यांच्यासमोर शरद पवार गटात येण्याचा प्रस्ताव मांडला असावा, अशी शक्यता आहे. या दोन्ही नेत्यांची ही भेट राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. मदन भोसले हे शरद पवार गटात गेल्यास वाई मतदारसंघातील समीकरणे बदलण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे आता पुढे काय घडणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.

जयंत पाटील हे मदन पाटील यांच्या घरातून हसतहसत बाहेर पडले. मात्र, त्यांनी भेटीबाबत काही बोलण्यास नकार दिला. भाजपमधील सर्वजण माझे मित्र आहेत, अशी मोघम प्रतिक्रिया देत जयंत पाटील यांनी तेथून काढता पाय घेतला. मात्र, आता मदन भोसले भाजपला सोडचिठ्ठी देऊन शरद पवार यांच्या गोटात दाखल होणार का, अशी चर्चा आता सुरु झाली आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये पश्चिम महाराष्ट्रातील भाजपच्या अनेक बड्या नेत्यांना शरद पवार गटाने गळाला लावल्याची चर्चा सुरु आहे. यापैकी कोल्हापूरमध्ये समरजीत घाटगे यांनी आपण शरद पवार गटात जाणार, हे जवळपास स्पष्टच केले आहे. त्यानंतर आता हर्षवर्धन पाटील, मदन भोसले हे हातात तुतारी धरतील, अशी जोरदार चर्चा सुरु आहे. याशिवाय, अजितदादा गटाचे आमदार अतुल बेनके यांनीही रविवारी शरद पवार यांची भेट घेतली. त्यामुळे तेदेखील लवकर शरद पवार गटात जातील, अशी चर्चा आहे. पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय पटलावर शरद पवारांनी टाकलेले हे डाव आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला आणि महायुतीला जेरीस आणतील, अशी चिन्हे आता दिसत आहेत.

Previous Post

राष्ट्रपती पदक यादीतून वरिष्ठ पोलीस निरीक्षकाची हकालपट्टी

Next Post

ब्रेकिंग | प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे जळगाव विमानतळावर आगमन

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
ब्रेकिंग | प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे जळगाव विमानतळावर आगमन

ब्रेकिंग | प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे जळगाव विमानतळावर आगमन

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group