• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मोठी ब्रेकिंग | कोल्हापुरातील ‘या’ मोठ्या नेत्याने दिला राजीनामा

Admin by Admin
August 22, 2024
in पश्चिम महाराष्ट्र, राजकीय
1 min read
0
मोठी ब्रेकिंग | सांगलीतील राजकारणात भूकंप होणार..! काँग्रेसची ही भूमिका.. म्हणाले, “आम्ही…..!”
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

कोल्हापूर – गोपनीय खबऱ्या | राज्यात विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. विधानसभेच्या मोर्चेबांधणीसाठी सर्व पक्ष तयारीला लागले असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाला कोल्हापूरमध्ये मोठा धक्का बसला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष आणि जिल्हा बँकेचे संचालक आनंदराव यशवंतराव तथा ए. वाय. पाटील यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे.

  • कोल्हापूरमध्ये अजित पवार गटाला धक्का

याबाबत सविस्तर माहिती अशी की, एकीकडे विधानसभेच्या तयारीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाने कंबर कसली आहे. स्वतः अजित पवार निवडणुकासाठी मोर्चेबांधणी करत असून जनसन्मान यात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्र पिंजून काढत आहेत. अशातच कोल्हापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठे खिंडार पडले आहे.

  • ए. वाय पाटील यांचा तडकाफडकी राजीनामा

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष आणि केडीसीसी बँकेचे संचालक ए. वाय. पाटील यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडे त्यांनी राष्ट्रवादीच्या प्राथमिक सदस्यत्वासह सर्व पदांचा राजीनामा पाठवला आहे.

  • मविआमधून विधानसभा लढवणार..?

ए. वाय पाटील यांनी पाठवलेल्या राजीनाम्यात वैयक्तिक अडचणींचे कारण दिले असले तरी ते महाविकास आघाडीच्या वाटेवर असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. ए वाय पाटील हे राधानगरी विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडी कडून रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. त्यामुळे विधानसभेआधी ते मविआमध्ये जाऊ शकतात. दरम्यान, अजित पवार गटाला विधानसभेआधी हा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे.

Previous Post

ब्रेकिंग | बदलापूरमधील आरोपी अक्षय शिंदेच घर स्थानिकांनी फोडलं, नराधमाची किती लग्न झाली? धक्कादायक माहिती समोर

Next Post

सांगली ब्रेकिंग | शिवप्रतिष्ठानकडून सांगली बंदचा निर्णय मागे, मोटरसायकल रॅली काढण्यात येणार..!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
सांगली ब्रेकिंग | शिवप्रतिष्ठानकडून सांगली बंदचा निर्णय मागे, मोटरसायकल रॅली काढण्यात येणार..!

सांगली ब्रेकिंग | शिवप्रतिष्ठानकडून सांगली बंदचा निर्णय मागे, मोटरसायकल रॅली काढण्यात येणार..!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group