-
खंडेराजुरीत मंत्री खाडेंची जंगी मिरवणूक
मिरज – खबऱ्या प्रतिनिधी | खंडेराजुरी येथे रविवारी तब्बल ३० कोटींच्या विकासकामांच्या वचनपूर्तीबाबत उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला होता. हलगी, ढोल ताशांच्या गजरात रथामधून पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांची जंगी मिरवणूक काढण्यात आली. विकासकामांसाठी निधी कमी पडू देत नाही. कारण, खंडेराजुरीवर माझे विशेष प्रेम आहे. असे पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे उदघाटन कार्यक्रमात बोलत होते.

खंडेराजुरी येथील ब्रम्हनाथ मंदिर परिसर, हनुमान मंदिर,गणपती मंदिर,बौद्ध वसाहत, यल्लमा मंदिर सभा मंडप, पेव्हिंग ब्लॉक, खंडेराजुरी ते गांधीनगर रस्ता, व पुलाच्या कामाचे उदघाटन करण्यात आले. यासाठी तब्बल ३० कोटींचा निधी देऊन वचनपूर्ती केल्याबद्दल ग्रामस्थांच्यावतीने पालकमंत्री खाडे यांचा सत्कार करण्यात आला. गावामध्ये आदर्शवत काम करणाऱ्या ग्रामसेवक संभाजी माने, पोस्टमास्तर मिथिलेश वाघमोडे, सूरज बाबर, विठ्ठल रूपनर, व ज्येष्ठ प्रतिनिधी पंडित बाबर यांचा सत्कार मंत्री खाडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळेस जैन समाज, बौद्ध समाज, यांच्यासह अहिल्यादेवी होळकर युवा प्रतिष्ठान, माजी सैनिक संघटना यांच्याकडून पालकमंत्री खाडे यांचा विशेष सत्कार घेण्यात आला. याप्रसंगी भाजप नेते दिनकर भोसले, राजू सुंगारे, बेडगचे सरपंच उमेश पाटील, डोंगरवाडीचे दिपक शिंदे, एरंडोलीचे महेश मोरे, गुंडेवाडीचे आनंदराव गडदे , गजानन रुकडे, सरपंच शुभांगी चव्हाण, संगीता यादव, किशोर कांबळे , किरण पाटील, पोपट चौगुले, रावसाहेब चौगुले, सर्जेराव पाटील, जंबू चौगले, ज्येष्ठ नेते शंकरराव भोसले, राष्ट्रवादीचे संजय चव्हाण, व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.

