• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

कुपवाडमध्ये दोन लाचखोरांच्या मुसक्या आवळल्या, उताऱ्यावर नावाची नोंद घालण्यास मागितली लाच

Admin by Admin
August 6, 2024
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
मिरज पोलीस दलातील “त्या” पोलिसाची “या” प्रकरणात तडकाफडकी बदली..! वाचा सविस्तर
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

कुपवाड – खबऱ्या प्रतिनिधी | मालमत्ता असेसमेंट उताऱ्यावर नावाची नोंद करण्यासाठी एक हजार रुपये लाचेची मागणी करुन रक्कम स्विकारल्याप्रकरणी मनपाच्या करविभागातील दोघे कर्मचारी लाचलुचपतच्या जाळ्यात सापडले. याप्रकरणी कनिष्ठ लिपीक इम्रान अब्दुल रहमान देसाई (वय ३५, रा. उदगाव वेस, झेंडे महाराज मठाजवळ, मिरज) आणि शिपाई राजेश संजीवन मोरे (वय ५२, रा. मोरे बिल्डिंग, महादेव मंदिराच्या पाठीमागे, चंदनवाडी, मिरज ) या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनेची माहिती अशी, तक्रारदार यांनी काही मालमत्ता खरेदी केली होती. त्याची असेसमेंट उताऱ्यावरील त्यांच्या काकांचे नाव कमी करुन स्वत:च्या नावाची नोंद होवून घरपट्टीची आकारणी करण्यासाठी तक्रारदार यांनी महापालिकेच्या कर विभागातील कनिष्ठ लिपिक इम्रान देसाई यांच्याशी संपर्क साधला. त्यावेळी लिपिक देसाई यांच्यासह शिपाई राजेश मोरे यांनी तक्रारदाराकडे १ हजारची मागणी केली. याबाबत तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार अर्ज केला होता.

सदर तक्रारीची शहानिशा केली असता यामध्ये तथ्य असल्याचे निदर्शनास आले. लिपीक देसाई यांना लाच देण्यासाठी शिपाई राजेश मोरे यांनी प्रोत्साहित केल्याचे सिध्द झाले. यानंतर मंगळवार दि. ६ रोजी सायंकाळी ५ च्या सुमारास कुपवाड कार्यालयातील कर विभागात लाचलुचपत विभागाचे पोलीस निरिक्षक विनायक भिलारे यांच्या पथकाने सापळा लावला. यावेळी दोघा संशयितांनी तक्रारदार यांच्याकडे लाचेची मागणी करुन एक हजारची रक्कम स्विकारताना पथकातील अधिकाऱ्यांनी त्यांना रंगेहाथ ताब्यात घेतले. दोघांविरोधात कुपवाड पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Previous Post

ब्रेकिंग | पोलीस अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्या.. पोलीस अधीक्षक व उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांचा समावेश..!

Next Post

कवलापूर विमानतळ होणे अत्यंत गरजेचे, कोण खोडा घालतंय..? – खासदार विशाल पाटील.

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
कवलापूर विमानतळ होणे अत्यंत गरजेचे, कोण खोडा घालतंय..? – खासदार विशाल पाटील.

कवलापूर विमानतळ होणे अत्यंत गरजेचे, कोण खोडा घालतंय..? - खासदार विशाल पाटील.

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group