• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

कवलापूर विमानतळ होणे अत्यंत गरजेचे, कोण खोडा घालतंय..? – खासदार विशाल पाटील.

Admin by Admin
August 7, 2024
in पश्चिम महाराष्ट्र, राजकीय
1 min read
0
कवलापूर विमानतळ होणे अत्यंत गरजेचे, कोण खोडा घालतंय..? – खासदार विशाल पाटील.
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सांगली – खबऱ्या प्रतिनिधी | सांगलीचा डंका विविध क्षेत्रात जगभर गाजतोय, निर्यातक्षम शेती उत्पादनांची मोठी बाजारपेठ असलेल्या सांगलीला जगाच्या बाजारपेठेशी कनेक्टिव्हिटी मिळण्यासाठी कवलापूरचे विमानतळ अत्यंत महत्त्वाचे आहे. परंतु, त्यात कोण खोडा घालतेय?


असा सवाल करून सांगली जिल्ह्याच्या विकासासाठी हे विमानतळ महत्त्वाचे असून त्याला लवकर मंजुरी द्यावी, अशी मागणी खासदार विशाल पाटील यांनी संसदेत केली.
विशाल पाटील म्हणाले, ‘खूप काळापासून कवलापूर विमानतळाचा प्रश्न प्रलंबित आहे. सांगली हळद नगरी म्हणून ओळखली जाते. साखर, हळद, डाळिंब, मका, कापड उत्पादनात आमचा भाग आघाडीवर आहे. या भागात देश-विदेशातील अनेक व्यापारी येऊ इच्छितात. कारण, आमची बाजारपेठ खूप मोठी आहे. पण, अडचण अशी आहे की आम्हाला हवाई मार्गाची कनेक्टिव्हिटी नाही. विमानसेवा नसल्याने अनेक व्यापारी इच्छा असून येथे येऊ शकत नाहीत.”


ते म्हणाले, “आमच्याकडे निर्यातक्षम उत्पादने आहेत. हळद निर्यातीत आम्ही नेहमीच आघाडीवर आहोत. यावर्षी 288 बिलियन यूएस डॉलरच्या हळदीची निर्यात आम्ही केली आहे. हे योगदान महत्त्वाचे आहे. विमानतळ झाल्यास आणखी निर्यात वाढेल, मात्र विमानतळ होऊ नये यासाठी या प्रयत्नात कुणीतरी खीळ घालतो आहे.

आमची जागतिक बाजाराशी, देशाशी कनेक्टिव्हिटी वाढवणे गरजेचे आहे. इथे अनेक मोठ्या शैक्षणिक संस्था आहेत. देशभरातून मुले येथे शिकायला येतात. पालकांना येथे येणे सोयीचे व्हावे, यासाठी विमानतळ गरजेचे आहे, असा मुद्दा त्यांनी मांडला.

Previous Post

कुपवाडमध्ये दोन लाचखोरांच्या मुसक्या आवळल्या, उताऱ्यावर नावाची नोंद घालण्यास मागितली लाच

Next Post

प्रेम विवाहानंतर पत्नी विभक्त राहिल्याचा राग मनात धरून पतीने केला खुनी हल्ला..!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
प्रेम विवाहानंतर पत्नी विभक्त राहिल्याचा राग मनात धरून पतीने केला खुनी हल्ला..!

प्रेम विवाहानंतर पत्नी विभक्त राहिल्याचा राग मनात धरून पतीने केला खुनी हल्ला..!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group