मिरज प्रतिनिधी – मिरजेतील प्रसिद्ध डॉ. सूर्यकांत व्हावळ यांच्या वाढदिवसानिमित्त १७ वे भव्य रक्तदान शिबिर शहरातील आयएमए हॉल येथे उत्साहात संपन्न झाले. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.सुरेश भाऊ खाडे तर अध्यक्षस्थानी डॉ.जी एस कुलकर्णी हे उपस्थित होते. यांच्यासह डॉ.विनोद परमशेट्टी, दि फेडरेशन ऑफ ऑर्गण अँड बॉडी डोनेशनच्या जिल्हा को-ऑर्डिनेटर डॉ. हेमा शितल चौधरी, डॉ. सूर्यकांत व्हावळ हे मान्यवर पाहुणे उपस्थित होते.

डॉ.हेमा चौधरी यांनी फेडरेशनच्या कार्याची थोडक्यात ओळख करून दिली. तसेच अवयव दानाचे महत्त्व विशद केले. या नोबेल कार्याला उत्स्फुर्त प्रतिसाद देत पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांनी लगेचच अवयवदान चळवळीच्या कामाचे कौतुक करून स्वतः चा देहदान तसेच अवयवदानाचा फॉर्म भरला आणि अवयवदान चळवळ वाढीस लागण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. या प्रसंगी डॉ.परमशेट्टी, डॉ. स्वप्निल नाडे, डॉ अश्विनी सातपुते यांनी देहदान तसेच अवयव दानाचे फॉर्म भरले.
सदर कार्यक्रमांमध्ये १५० हुन अधिक रक्तदात्यांनी रक्तदान करून अनेक गरजू रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी सहकार्य केले. या कार्यक्रमामध्ये माऊली धन्वंतरी पुरस्कार डॉ. राजीव गांधी आणि डॉ.निकीत मेहता यांना प्रदान करण्यात आला.तर माऊली कलारत्न पुरस्कार प्रसिद्ध शास्त्रीय संगीत तज्ञ पंडित ऋषिकेश बोडस यांना प्रदान करण्यात आला.माऊली प्रेरणा पुरस्कार जेनरीकार्टचे डायरेक्टर श्रीपाद कोल्हटकर यांना देऊन सन्मानित करण्यात आले.

संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन गेली १७ वर्षे सातत्याने माऊली फौंडेशनच्या वतीने करण्यात येते. डॉ. सूर्यकांत व्हावळ सर आणि टीमने याही वर्षी उत्तम आयोजन केले.गणेश वंदना श्रद्धा व्हावळ- मूळे यांनी केले. प्रस्तावना डॉ. हृषीकेश व्हावळ यांनी केले तर आभार अरुण मालगावे यांनी मानले. सांगता डॉ. चिदानंद चिवटे यांच्या पसायदानाने झाली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धीरज पलसे यांनी केले.

