• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

आम्हाला ‘हा’ नेता मुख्यमंत्री पाहिजे..! शिंदे, फडणवीस, ठाकरे नव्हे तर राज्यातील मतदारांना पाहिजे असलेला नेता कोण.. ? वाचा सविस्तर

Admin by Admin
July 18, 2024
in मंत्रालय, राजकीय
1 min read
0
आम्हाला ‘हा’ नेता मुख्यमंत्री पाहिजे..! शिंदे, फडणवीस, ठाकरे नव्हे तर राज्यातील मतदारांना पाहिजे असलेला नेता कोण.. ? वाचा सविस्तर
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

Future Maharashtra CM | सध्या राज्याचे मुख्यमंत्री हे एकनाथ शिंदे आहेत. तर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार आहेत. याचसह राज्यातील माजी मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंनी देखील याआधी धुरा सांभाळली होती. मात्र आता मतदारांना महाराष्ट्र राज्याचा आगामी मुख्यमंत्री कोण असेल? याबाबत सवाल आहे. याबाबत एक सर्व्हे करण्यात आला होता. त्या सर्व्हेमध्ये मतदारांनी भाजपच्या बड्या नेत्याला पसंती दिली आहे.

राज्यातील जनतेला मुख्यमंत्री म्हणून कोणाला पाहायला आवडेल?

लोकसभा निवडणूक नुकतीच पार पडली आहे. या लोकसभा निवडणुकीत महायुतीने राज्यात केवळ 17 जागांवर विजय मिळवला आहे. तसेच महविकास आघाडीने 30 जागांवर विजय मिळवला आहे. तसेच सांगलीत अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी विजय मिळवला. या निकालाचा आगामी विधानसभा निवडणुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. अशातच आता राज्यातील जनतेला मुख्यमंत्री म्हणून कोणाला पाहायला आवडेल? असा सवाल एका सर्व्हेच्या माध्यमातून केला गेला. त्यामध्ये भाजपच्या नेत्याला सर्वाधिक पसंती दिली.

राज्याचा मुख्यमंत्री कोण? याबाबत एक सर्व्हे करण्यात आला होता. त्यामध्ये मतदारांनी भाजपच्या नेत्याला राज्याचे मुख्यमंत्री म्हणून सर्वाधिक पसंती देण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याहून अधिक भाजपच्या नेत्याला भावी मुख्यमंत्री पसंती देण्यात आली आहे.

राज्याचा मुख्यमंत्री म्हणून कोण व्हावसं वाटतं? असा सवाल सर्व्हेत करण्यात आला. भाजपचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना राज्याचे आगामी मुख्यमंत्री बनवावं असा मतदारांचा कल आहे. नितीन गडकरींच्या भावी मुख्यमंत्री नावाला पसंती देण्यात आली आहे.

सर्व्हेंच्या मतांची आकडेवारी आली समोर..

भाजपच्या कोणत्या नेत्याला मुख्यमंत्रिपदी बसलेलं पाहायला आवडेल असं विचारलं गेलं, तेव्हा मतांनुसार टक्केवारी काढण्यात आली आहे. 18.8 टक्के लोकांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला पसंती दिली आहे. 47.7 टक्के लोकांनी नितीन गडकरींना पसंती दिली आहे. तर विनोद तावडेंना 6.3 टक्के पसंती दिली आहे. तर 14.5 टक्के एकनाथ शिंदेंना तसेच 5.3 टक्के अजित पवारांना पसंती दिली.

तसेच उद्धव ठाकरेंना लोकांनी मुख्यमंत्री पदासाठी 22.4 टक्के पसंती दिली. 6.8 टक्के लोकांनी सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री म्हणून पसंती देण्यात आली आहे. तसेच काँग्रेस नेते नाना पटोले यांना 4.7 टक्के लोकांनी पसंती दिली आहे.

Previous Post

मोठी ब्रेकिंग | मंत्रीमंडळ विस्ताराबाबत अपडेट, खाते बदल होणार..?

Next Post

‘त्या’ प्रकरणात परस्परविरोधी गुन्हे दाखल : मिरज ग्रामीण पोलिसांत नोंद..!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मोठी ब्रेकिंग | सांगलीतील राजकारणात भूकंप होणार..! काँग्रेसची ही भूमिका.. म्हणाले, “आम्ही…..!”

'त्या' प्रकरणात परस्परविरोधी गुन्हे दाखल : मिरज ग्रामीण पोलिसांत नोंद..!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group