मिरज ; खबऱ्या प्रतिनिधी;
मिरज शहरांत हिंदू-मुस्लिम बांधवांचे अनोखे नाते पहावयास मिळते. मुस्लिम धर्मियांचा पवित्र सण रमजान ३ मे रोजी साजरा होतोय, तर २ मे रोजी आम्ही शिवभक्त संघटनेच्या वतीने शिवजयंती साजरी करून मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे.
याच पार्श्वभूमीवर मिरज शहर पोलिसांनी संवेदनशील भागात दंगा-वादावादी होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणून आज शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात दंगल काबू प्रात्यक्षिक केले.

या प्रात्यक्षिकामध्ये लाठीचार्ज करण्यासंदर्भात ट्रेंनिग देण्यात आले. कोणत्याही क्षणी घटित-अघटितपणे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवला तर त्यास नियंत्रित कसे करावे..?यासाठी हे प्रात्यक्षिक करत असल्याचे मिरज शहर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेंद्र सावंत्रे यांनी गोपनीय खबऱ्याशी बोलताना सांगितले.
मिरजेतील मिरासाहेब दर्गाह येथेही या प्रात्यक्षिकाचा भाग घेण्यात येणार आहे. तसेच आज सायंकाळी शहरातून पोलिसांचा रूट मार्च निघणार आहे.

प्रात्यक्षिक वेळी पोलीस निरीक्षक राजेंद्र सावंत्रे, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत, वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल माने यांच्यासाहित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

