• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मिरज | छत्रपती शिवरायांची तब्बल ‘इतकी’ उंच अश्वारूढ मूर्ती..! पाहण्यासाठी शिवभक्तांची गर्दी, आज मिरवणूक.. वाचा सविस्तर

Admin by Admin
May 9, 2024
in पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
मिरज | छत्रपती शिवरायांची तब्बल ‘इतकी’ उंच अश्वारूढ मूर्ती..! पाहण्यासाठी शिवभक्तांची गर्दी, आज मिरवणूक.. वाचा सविस्तर
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मिरज प्रतिनिधी | खबऱ्या ऑनलाईन – मिरजेतील ‘आम्ही शिवभक्त’ संघटनेच्या वतीने यंदा शिवजयंती निमित्त पश्चिम महाराष्ट्रातील सर्वांत उंच म्हणजेच तब्बल २८ फुटी शिवरायांची अश्वारूढ मूर्ती आणण्यात आली आहे. आज गुरुवारी (९ मे) मिरजेत या मूर्तीची मिरवणूक काढण्यात येणार आहे.

प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही मिरजेत शिवजयंती उत्सवाचे आयोजन केले आहे. यंदाच्या शिवजयंतीत २८ फुटी उंच शिवरायांची मूर्ती आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे. पुणे जिल्ह्यातील वाघोली येथून ही मूर्ती आणण्यात आली आहे. पाच दिवसांपूर्वी मिरजेत ही मूर्ती दाखल झाली आहे. आज मूर्तीची मिरवणूक काढण्यात येणार आहे. सायंकाळी पाच वाजता गुजरातमधील सानंदचे आमदार कनुभाई पटेल यांच्या हस्ते मूर्तीचे पूजन होणार आहे. त्यानंतर साडेपाच वाजता नदीवेस कोळीवाडा येथून मिरवणुकीला सुरुवात होईल. शहरातील प्रमुख मार्गांवरून ही मिरवणूक काढण्यात येणार असून, रात्री दहा वाजता शिवतीर्थ येथे मिरवणुकीची सांगता होईल. त्या ठिकाणी महाप्रसादाचे आयोजन केले आहे.

मूर्ती पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी –
संपूर्ण मूर्ती फायबरपासून बनविली असून, लोखंडी अँगलही आहेत. अश्वारूढ मूर्ती अत्यंत देखणी व भव्य असल्याने ती पाहण्यासाठी आतापासून गर्दी होत आहे.

दरवर्षी आम्ही शिवभक्त संघटनेमार्फत मोठी मिरवणूक काढण्यात येते. यंदा २८ फुटी मूर्ती आणून उत्सवात नवा रंग भरण्याचा प्रयत्न आहे. संघटनेची मिरवणूक पाहण्यासाठी प्रत्येक वर्षी मिरज व परिसरातील ग्रामीण भागातूनही शिवभक्त गर्दी करीत असतात. यंदा मूर्ती पाहण्यासाठी आतापासून गर्दी होत आहे.
– विकास सूर्यवंशी, संस्थापक अध्यक्ष, आम्ही शिवभक्त संघटना, मिरज.

Previous Post

पंतप्रधानांचे कार्यालय हे वसुली कार्यालय – प्रकाश आंबेडकर

Next Post

आपत्कालीन परिस्थितीमध्ये सर्व यंत्रणांनी समन्वय ठेवावा – जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
आपत्कालीन परिस्थितीमध्ये सर्व यंत्रणांनी समन्वय ठेवावा – जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी

आपत्कालीन परिस्थितीमध्ये सर्व यंत्रणांनी समन्वय ठेवावा - जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group