• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

पंतप्रधानांचे कार्यालय हे वसुली कार्यालय – प्रकाश आंबेडकर

Admin by Admin
May 5, 2024
in राजकीय
0
पंतप्रधानांचे कार्यालय हे वसुली कार्यालय – प्रकाश आंबेडकर
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पंतप्रधान कार्यालय हे वसुली कार्यालय बनले असून ईडी, सीबीआय, पोलीस या यंत्रणांचा वापर करून निवडणूक रोख्याच्या माध्यमातून वसुली केली जाते. करोना काळात बंदी असलेल्या औषध विक्रीला परवानगी देण्यासाठी १८ कोटींची वसुली निवडणूक रोख्यातून केली.

अशा मौत का सौदागरच्या हाती पुन्हा देश देण्याची चूक करू नका, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी रविवारी मिरजेत केले.

सांगली लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्या प्रचाराच्या सांगता सभेत अ‍ॅड. आंबेडकर बोलत होते. यावेळी जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री पाटील, गवई गटाचे नेते डॉ. राजेंद्र गवई, माजी मंत्री अजितराव घोरपडे आणि माजी स्थायी सभापती निरंजन आवटी यांची भाषणे झाली.

यावेळी अ‍ॅड. आंबेडकर यांनी भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, करोना काळात जागतिक आरोग्य संघटनेने बंदी घातलेल्या रेमडिसिवयरचे उत्पादन गुजरातमधील कंपनीकडून केले जात होते. १८ कोटी रुपये निवडणूक रोख्यातून मिळाल्यानंतर या औषधाच्या विक्रीला देशात परवानगी देण्यात आली. या औषधाचे दुष्परिणाम म्हणून अनेकांना व्याधी जडल्या. अशा मौत का सौदागरला आपण पुन्हा संधी द्यायची का याचा विचार करण्याची वेळ आली आहे.

पंतप्रधान कार्यालय हे मानवतेचे कार्यालय असायला हवे. मात्र, या ठिकाणाहून निवडणूक रोख्याच्या माध्यमातून ईडी, सीबीआय, पोलीस या यंत्रणाचा वापर करून खंडण्या गोळा करण्यात येतात. गेल्या दहा वर्षाच्या काळात देशातील ५० कोटींहून अधिक मालमत्ता असलेल्या १७ लाख हिंदू कुटुंबांनी देश सोडला. दहा वर्षांपूर्वी शंभर रुपयापैकी २६ रुपये कर्ज होते, आता ते ८४ रुपयावर पोहोचले असून आणखी पाच वर्षांनी ९६ रुपयापर्यंत पोहोचेल. अशा स्थितीत देश कसा चालविणार याचा विचार करण्याची हीच वेळ आहे असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले.

Previous Post

बिग ब्रेकिंग | शरद पवारांचे सर्व दौरे अचानक रद्द, प्रकृतीबाबत महत्त्वाची अपडेट.. वाचा सविस्तर

Next Post

मिरज | छत्रपती शिवरायांची तब्बल ‘इतकी’ उंच अश्वारूढ मूर्ती..! पाहण्यासाठी शिवभक्तांची गर्दी, आज मिरवणूक.. वाचा सविस्तर

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मिरज | छत्रपती शिवरायांची तब्बल ‘इतकी’ उंच अश्वारूढ मूर्ती..! पाहण्यासाठी शिवभक्तांची गर्दी, आज मिरवणूक.. वाचा सविस्तर

मिरज | छत्रपती शिवरायांची तब्बल 'इतकी' उंच अश्वारूढ मूर्ती..! पाहण्यासाठी शिवभक्तांची गर्दी, आज मिरवणूक.. वाचा सविस्तर

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group