• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

काय सांगताय राव..! प्रचाराचा भव्य कार्यक्रम पण कार्यकर्त्यांची दांडी ! लोकच न आल्याने कार्यक्रम रद्द.. वाचा सविस्तर

Admin by Admin
May 3, 2024
in राजकीय
1 min read
0
काय सांगताय राव..! प्रचाराचा भव्य कार्यक्रम पण कार्यकर्त्यांची दांडी ! लोकच न आल्याने कार्यक्रम रद्द.. वाचा सविस्तर
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सध्या लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत सर्वत्र सभा सुरू आहेत. अहमदनगर जिल्ह्यात विविध राजकीय गणिते तयार होताना दिसतायेत. तर काही ठिकाणी उमेदवारांना रोषाला सामोरे जावे लागताना दिसत आहे. दरम्यान आपलाच प्रचार कार्यक्रम ऐनवेळी रद्द करण्याची वेळ शिंदे गटाचे उमेदवार खा.सदाशिव लोखंडे यांच्यावर आली.

लोखंडे यांचा देवळाली प्रवरा येथे प्रचार शुभारंभ व भव्य कार्यकर्ता मेळावा आणि कार्यालयाचा शुभारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र, नियोजित वेळ होऊनही कार्यकर्त्यांसह मतदारांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरविली. त्यामुळे अखेरीस गर्दी न जमल्याने त्यांना हा कार्यक्रम रद्द करावा लागलं अशी माहिती मिळाली आहे.

देवळाली प्रवरासह ३२ गावांसाठी देवळाली प्रवरा शहरात मिंधे गटाचे संपर्क कार्यालय सुरू करण्यात आले. या कार्यालयाचा प्रारंभ महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील व कृषिमंत्री दादा भुसे यांच्या प्रमुख उपस्थित होणार होता. परंतु सभेच्या ठिकाणी अवघे दहा ते वीस कार्यकर्ते उपस्थित होते.

सायंकाळी सात वाजेपर्यंत कार्यकर्ते व मतदारांची गर्दी होईल, अशी आशा नेत्यांना होती. परंतु गर्दी न जमल्यामुळे अखेर कार्यालय व प्रचाराचा शुभारंभ कार्यक्रम रद्द करावा लागला. या कार्यक्रमास पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांचीदेखील प्रमुख उपस्थिती होती.

म्हणून विखे यांचे समर्थक दुपारपासून कार्यक्रमस्थळी हजर झाले होते. परंतु खासदार लोखंडे यांच्या कार्यक्रमाकडे कार्यकर्त्यांसह मतदारांनी पाठ फिरवल्याची चर्चा होती. खासदार सदाशिव लोखंडे यांनी यांच्यावर राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरासह ३२ गावांमध्ये प्रचार करण्याच्या उद्देशाने संपर्क कार्यालयाचा प्रारंभ तसेच कार्यकर्ता मेळावा आयोजित केला होता.

कार्यक्रमाची वेळ सायंकाळी ४ वाजता निश्चित करण्यात आली होती. त्यानुसार कार्यक्रमस्थळी सर्व तयारी करण्यात आली होती. परंतु सायंकाळी सात वाजेपर्यंत भाजपचे तुरळक कार्यकर्ते वगळता कार्यक्रमस्थळी कार्यकर्त्यांसह मतदारांची गर्दीच न झाल्याने लोखंडे यांना हा कार्यक्रम रद्द करण्याची नामुष्की आली.

त्यामुळे पालकमंत्री राधाकृष्ण विखे हे परस्पर नगर दक्षिणेत प्रचारासाठी निघुन गेले. तर कृषी मंत्री दादा भुसे हे श्रीरामपूर येथिल हेलिपॅडवर उतरून प्रमुख कार्यकर्त्यांची कानउघाडणी करून पुढील कार्यक्रमास निघून गेल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये रंगली होती.

मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नगरला जाण्यापूर्वी प्रमुख कार्यकर्त्यांना व आयोजकांना खासगीत चांगलेच झापल्याची चर्चा आहे. खासदार लोखंडे यांचा कार्यकर्ता मेळावा व कार्यक्रमाचे ठिकाण नवीन कार्यालयासमोर किंवा बाजारतळावर ठेवण्यात यावे, असे चर्चेतून पुढे आले.

हा कार्यक्रम एका संस्थेच्या आवारात ठेवल्यामुळे व स्थानिक राजकीय कलहातून अनेक कार्यकर्त्यांसह मतदारांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवल्याची चर्चा होत आहे.

Previous Post

शरद पवार उद्धव ठाकरेंना बाहेर थांबा म्हणाले ? वाचा सविस्तर

Next Post

शरद पवारांच्या ताफ्यातील गाड्यांचा भीषण अपघात

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
शरद पवारांच्या ताफ्यातील गाड्यांचा भीषण अपघात

शरद पवारांच्या ताफ्यातील गाड्यांचा भीषण अपघात

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group