मिरज प्रतिनिधी | खबऱ्या ऑनलाईन – मिरज शहरातील इदगाहनगर पासून शंभर फुटीकडे जाणाऱ्या रस्त्यालगत असणाऱ्या बेथेस्तदा विद्यालयाच्या समोर असणाऱ्या दुर्गाडे गोदड इंडस्ट्रीज मध्ये भीषण आग लागली.

आज मंगळवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास वीज प्रवाह सुरू असणाऱ्या ट्रान्सफॉर्मर मधून शॉर्टसर्किट होवून आगीची ठिणगी भंगार गोडाऊन मधील कचऱ्यात पडली. कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून आगीने जोर पकडला. या आगीचे लोण इतके पसरले की, मिरज एमआयडीसी परिसरात काळ्या धुराने काही परिसर व्यापला होता. या ठिकाणी अग्निशमन विभागाच्या दोन गाड्या तातडीने दाखल झाल्या असून आग विझवण्याचे अटोकाट प्रयत्न सुरू आहेत.घटनास्थळी बघ्यांची प्रचंड गर्दी झाली आहे.


