• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सांगली ब्रेकिंग | भीषण अपघात, प्रचंड आक्रोश..! वऱ्हाडातील पाच जणांचा जागीच मृत्यू, गाडीने घेतला पेट..! लग्नाचा फराळ-रुखवत रस्त्यावर विखुरलं..

Admin by Admin
April 17, 2024
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, सामाजिक
1 min read
0
मोठी ब्रेकिंग | सांगलीतील राजकारणात भूकंप होणार..! काँग्रेसची ही भूमिका.. म्हणाले, “आम्ही…..!”
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सांगली प्रतिनिधी | खबऱ्या ऑनलाईन – विजापूर-गुहागर महामार्गावर कवठेमहांकाळ तालुक्यातील जांभूळवाडी गावानजीक क्रूझर जीप आणि खासगी ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात. या अपघातात क्रूझर मधील पाच जणांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

अपघाताची भीषणता लक्षात घेता मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. बुधवारी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास विजापूर – गुहागर महामार्गावर हा अपघात झाला आहे.

घटनास्थळावरुन मिळालेल्या माहितीनुसार, जमखंडी (ता. बागलकोट, कर्नाटक) येथून क्रुझरमधून लग्नासाठीचे वऱ्हाड सावर्डे (ता. तासगाव, जि. सांगली) येथे येत होते. दोन क्रुझर तसेच नवरी मुलीसाठी स्वीफ्ट मोटार होती. ही वाहने बुधवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास विजापूर-गुहागर महामार्गावरील जांभुळवाडी येथे आली. यावेळी 14 ते 15 जण बसलेल्या क्रुझरने पाठीमागून ट्रॅव्हल्सला जोराची धडक दिली. या धडकेत पाच जण जागीच ठार झाले.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. कवठेमहांकाळ आणि जत पोलिसांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली. तिघांची प्रकृती गंभीर आहे. गंभीर जखमी झालेल्यांवर ढालगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करुन पुढील उपचारासाठी त्यांना मिरज सिव्हिल हॉस्पिटलला हलवले.

अपघातानंतर घटनास्थळीचे दृश्य हृदय पिळवटून टाकणारे होते. याठिकाणी इतर वऱ्हाडींनी आक्रोश सुरु केला. रात्रीची वेळ असल्याने मृतदेह काढण्यात अडचणी येत होत्या. अपघातानंतर क्रुझरने पेट घेतला. अग्निशमन दलाला पाचारण केल्यानंतर अग्निशमन दलाने आग विझविली. यावेळी बघ्यांची प्रचंड गर्दी जमली होती.

लग्नाचं रुखवत रस्त्यावर विखुरलं

ही दुर्घटना इतकी भीषण होती की, क्रुझर जीप ट्रॅव्हल्सला जोरात धडकली आणि त्यामध्ये क्रुझरच्या पुढच्या भागाचा पूर्णपणे चेंदामेंदा झाला. अपघातावेळी क्रुझर खच्चून भरली होती. क्रुझरच्या पुढच्या भागाचा चेंदामेंदा झाल्याने या भागात बसलेल्या लोकांचे काय झाले असेल, याची कल्पना येऊ शकते. या अपघातामध्ये 5 जणांचा जागीच मृत्यू झाला. तर आणखी चार ते पाच वऱ्हाडी गंभीर जखमी आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. जमखंडीवरुन सावर्डेला निघालेल्या वऱ्हाडींनी आपल्यासोबत लग्नासाठी आणलेले साहित्य, रुखवत अपघातानंतर रस्त्यावर पडले होते. घटनास्थळी हे विदारक दृश्य पाहून उपस्थितांचे काळीज गलबलून आले. या प्रसंगामुळे घटनास्थळी अक्षरश: स्मशानशांतता पसरली होती.

Previous Post

मोठी ब्रेकिंग | म्हैसाळमध्ये पोलिसांची मोठी कारवाई.. वाचा सविस्तर

Next Post

मोठी बातमी | सांगलीत संभाजी भिडे यांनी फडणवीसांच्या कानात सांगितलं..? चर्चांना उधाण

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मोठी बातमी | सांगलीत संभाजी भिडे यांनी फडणवीसांच्या कानात सांगितलं..? चर्चांना उधाण

मोठी बातमी | सांगलीत संभाजी भिडे यांनी फडणवीसांच्या कानात सांगितलं..? चर्चांना उधाण

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group