• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

पोलीस निरीक्षकासह सात पोलीस कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल , सीआयडी ने स्वतः दिली फिर्याद…

Admin by Admin
April 22, 2022
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
पोलीस निरीक्षकासह सात पोलीस कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल , सीआयडी ने स्वतः दिली फिर्याद…
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : दरोडा व जबरी चोरी गुन्ह्यातील पारधी समाजातील आरोपी भीमा काळे याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा ठपका ठेवत गुन्हे अन्वेषण विभागाने फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उदयसिंह पाटील यांच्यासह सहाय्यक पोलिस निरीक्षक शीतलकुमार कोल्हाळ यांच्या बरोबर इतर पाच पोलिसांवर गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा दाखल झाल्याने पोलीस निरीक्षक उदयसिंह पाटील चांगलेच अडचणीत आले आहेत. यापूर्वी डान्स बार प्रकरणात त्यांना पोलीस आयुक्तांनी निलंबित केले होते. आरोपी भीमा काळे याचा मृत्यू नंतर त्याची पत्नी आणि मुलांनी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये थेट पोलिसांवर आरोप केला होता.

सिद्रामप्पा गजा, पोलीस उपअधिक्षक गुन्हे अन्वेषण विभाग, सोलापूर पथक यांनी दाखल केलेल्या फिर्यादीवरून वपोनि उदयसिंह शामराव पाटील, सपोनि शितलकुमार मारुती कोल्हाळ, पोहेकॉ श्रीरंग तुकाराम खांडेकर, पोना शिवानंद दत्तात्रय भिमदे, पोना अंबादास बालाजी गड्डुम, पोशि अतिश काकासाहेब पाटील. पोना लक्ष्मण पोमु राठोड, विजापूर नाका पोलीस स्टेशन, सोलापूर शहर या सात जणां विरुद्ध भादंविसक ३०४,३३०,१६६,३४ प्रमाणे विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विजापूर नाका पोलीस ठाणे अंतर्गत भादविसंक ४५४,४५७,३८० या गुन्हयातील आरोपी नामे भिमा रज्जा काळे, वय ४२ वर्षे, रा. भांबुरे वस्ती, पारधी वस्ती, कुर्डुवाडी, ता. माढा, जि. सोलापूर यास दि. २२/०९/२०२१ रोजी जिल्हा कारागृह सोलापूर येथुन सपोनि कोल्हाळ यांनी वर्ग करुन ताब्यात घेवून न्यायालयाकडून त्याची दि. २२/०९/२०२१ रोजी ते दि. २५/०९/२०२१ रोजी पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मंजुर करुन घेतलेली होती.

पोलीस कस्टडीत असताना आरोपीस सर्दी, ताप, खोकला व उलटया होत असल्याने व दोन्ही पायास कशाचेतरी संसर्ग झाल्यामुळे व त्याचे दोन्ही पाय सुजल्याने त्यास उपचाराकरीता सिव्हील हॉस्पीटल सोलापूर येथे दि. २४/०९/२०२१ रोजी १४.२५ वा मेडीकल यादीसह सपोनि कोल्हाळ तत्कालीन नेम विजापूर नाका पोलीस ठाणे सोलापूर शहर यांनी उपचारास दाखल केले असता त्याच्यावर उपचार चालु असताना आरोपीत भिमा रज्जा काळे हा दि. ०३/१०/२०२१ रोजी २०.४५ वा मयत झाल्याने विजापूर नाका पोलीस ठाणे अ.म.र.नं. १११/२०२१ सी आर पी सी कलम १७४ प्रमाणे मयत दाखल करण्यात आलेली आहे.

सदर मयताचे झालेल्या तपासावरुन गुन्हयातील अटक आरोपी भिमा रज्जा काळे यांनी गुन्हा कबुल करावा व गुन्हयातील चोरीस गेलेला माल काढुन दयावा म्हणून त्यास गुन्हयाचे तत्कालीन तपासी अधिकारी सपोनि कोल्हाळ, पोहवा श्रीरंग तुकाराम खांडेकर, पोना शिवानंद दत्तात्रय भिमदे, पोना अंबादास बालाजी गड्डम, पोशि अतिश काकासाहेब पाटील, व पोना लक्ष्मण पोमु राठोड यांनी पोलीस कस्टडीतील आरोपीस मारहाण केली आहे.

तसेच विजापूर नाका पोलीस ठाणे तत्कालीन वरीष्ठ पोलीस निरीक्षक उदयसिंह शामराव पाटील यांनी वि. ना.पो.ठाणे गु.र.नं. ३९५ / २०२१ कलम ४५४,४५७,३८० भादविसं या गुन्हयातील तपासी अधिकारी सपोनि कोल्हाळ यांना गुन्हयाच्या तपासामध्ये मार्गदर्शक सुचना दिलेचे दिसुन आले नाही.

तसेच दि. २२/०९/२०२१ रोजी रात्री २०.०० वा चे सुमारास तपासीक अधिकारी यांनी यातील अटक आरोपी नामे भीमा रज्जा काळे यास त्यांचेसमक्ष हजर केले. त्यावेळी आरोपी हा लंगडत असल्याचे व त्याचे दोन्ही पाय काळसर दिसत असल्याचे निदर्शनास येवून सुध्दा आरोपीस वैदयकीय उपचाराची आवश्यकता असतानासुध्दा त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. तसेच सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालय यांचे दिलेले मार्गदर्शक सुचनेप्रमाणे पोलीस ठाणे आवारात व प्रत्येक कक्षात सीसीटिव्ही कॅमेरे सुस्थितीत ठेवून त्याची छायाचित्रण जतन करण्याचे प्रशासकीय जबाबदारी पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांच्यावर येते. परंतु विजापूर नाका पोलीस ठाणे येथील गुन्हे प्रकटीकरण कक्षात सीसीटिव्ही कॅमेरा असने आवश्यक असताना सदर ठिकाणी उपलब्ध केला नाही.

वरील आरोपीत मजकूर यांनी वि. ना. पो. ठाणे गु.र.नं. ३९५ / २०२१ मधील आरोपीत भिमा रज्जा काळे (मयत) यास केलेल्या मारहाणीमुळे झालेल्या जखमांकडे तसेच सदरील मयत ही मानसिकदृष्ट्या सक्षम नसल्याचे माहित असतानाही त्याची वैद्यकीय आजारपणे व मारहाणीमुळे झालेल्या जखमांवर जाणीवपूर्वक दुर्लक्ष करुन तात्काळ वैद्यकीय मदत न पुरवता त्याच्या मृत्युस कारणीभुत झाले. या प्रकरणाचा पुढील तपास डीवायएसपी जी व्ही दिघावकर, नेम गुन्हे अन्वेषण विभाग भरारी पथक पुणे हे करीत आहेत.

Previous Post

मिरजेतील महात्मा गांधी पोलीस ठाण्यात राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांच्या विरोधात तक्रार…

Next Post

ब्रेकींग: अखेर ‘त्या’ शिवसेना पदाधिकाऱ्याला अटक

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
ब्रेकींग: अखेर ‘त्या’ शिवसेना पदाधिकाऱ्याला अटक

ब्रेकींग: अखेर ‘त्या’ शिवसेना पदाधिकाऱ्याला अटक

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group