इस्लामपूर या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या परिवार संवाद मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधानपरिषदेतील आमदार अमोल मिटकरी यांनी 19 एप्रिल 2022 रोजी केलेल्या पौरोहित्य करणाऱ्या पुरोहित यांच्या बद्दल केलेल्या खोटे आक्षेपार्ह बेताल वक्तव्याचा विरोधात मिरज शहर ब्राह्मण परिवार महाराष्ट्र च्या वतीने महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी आमदार अमोल मिटकरी यांच्या बेताल वक्तव्याने संतप्त झालेल्या पुरोहित मंगल कार्यालय धारक आणि ब्राह्मण समाज बांधवांनी गर्दी केली होती.
महात्मा गांधी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांना ब्राह्मण परिवार महाराष्ट्र च्या वतीने तक्रारी अर्ज दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रवादीच्या परिवार संवाद मेळाव्यात हजारोंच्या जनतेसमोर जाहीर भाषण करताना पौरोहित्य करणाऱ्या पुरोहित आणि एकूण हिंदूधर्मातील धार्मिक विधी बद्दल अत्यंत प्रक्षोभक आणि जातीवादी तेढ निर्माण करणारी विधाने केला असल्याचा आरोप ब्राह्मण समाजाच्या वतीने करण्यात आला.
आमदार अमोल मिटकरी यांच्या भाषणाने ब्राह्मण समाजातील तसेच हिंदू धर्मीयांच्या भावना दुखावल्या गेल्या असून जातीय आणि धार्मिक अशांतता निर्माण झाली आहे त्यामुळे त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी ब्राह्मण समाजाच्या वतीने महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. यावेळी ओमकार शुक्ल, किशोर पटवर्धन, विनोद गोरे हेमंत गलांडे, सुमेध ठाणेदार, सुधीर गलांडे जयंत सहस्त्रबुद्धे निलेश साठे भास्कर कुलकर्णी, राजकुमार काकीर्डे, संदीप शेगुणशी,
हेमंत गलांडे, विनोद गोरे, अभय आठवले, आनंद आठवले, ओंकार जोशी, अक्षय गुमास्ते, अमृत गाडगीळ, चिंतामणी जोशी, ज्येष्ठराज बेडेकर, अवधूत अर्जुनवाडकर, हनुमंतराव ग्रामोपाध्ये बुवा , चैतन्य तांबोळकर ,कवठेकर, मिलिंद अर्जुनवाडकर,भास्कर कुलकर्णी, हरिहर अडीवरेकर, अनिल देशपांडे, समीर कुलकर्णी, यांच्यासह सर्व पुरोहित संघटनेचे पदाधिकारी पौरोहित्य करणारे गुरुजी मंगल कार्यालय केटरिंग इत्यादी व्यवसाय करणारे व्यवसायिक नोकरदार यांच्यासह असंख्य समाज बांधव उपस्थित होते.

