• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

ब्रेकिंग | सांगलीच्या जागेवरचा तेढ वाढला; चंद्रहार पाटील-संजय राऊत तातडीने मुंबईला रवाना

Admin by Admin
April 7, 2024
in राजकीय
1 min read
0
ब्रेकिंग | सांगलीच्या जागेवरचा तेढ वाढला; चंद्रहार पाटील-संजय राऊत तातडीने मुंबईला रवाना
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सांगलीच्या जागेवरचा तेढ कधी सुटणार?, मविआचा उमेदवार कोण? याची चर्चा सांगलीसह राज्याच्या राजकीय वर्तुळात होत आहे. अशातच शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रहार पाटील आणि संजय राऊत सांगलीहून मुंबईसाठी रवाना झाले आहेत.

चंद्रहार पाटील यांच्या प्रचारासाठी राऊत सांगलीत गेले होते. आता संजय राऊत यांच्यासोबत चंद्रहार पाटील हेलिकॉप्टरने मुंबईला रवाना झाले आहेत. शिवसेना काही उमेदवारांची बैठक आणि सांगली-कोल्हापूरवासीयांची बैठक असल्याने चंद्रहार पाटील मुंबईला येत असल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं आहे.

सांगलीच्या जागेवर संजय राऊत म्हणाले…

आज सकाळीच काँगेस हायकमांडशी बोलणं झालं आहे. त्यामुळे चंद्रहार पाटील हेच उमेदवार असतील, हे जबाबदारीने बोलतो आहे. शेवटपर्यंत आघाडीमध्ये पेच आहे. पण एकमेकांशी चर्चा करून तो सोडवला जाईल. काही ठिकाणी शिवसेना, काही ठिकाणी काँग्रेस लढण्यासाठी आग्रह आहे. पण वरिष्ठ पातळीवरून कार्यकर्त्यांना सांगायचं असतं. त्यामुळे सगळ्या पक्षाचे नेते मिळून याबाबत निर्णय घेतील, असं संजय राऊत म्हणाले.

मैत्रिपूर्ण लढतीवर राऊत म्हणाले…

मैत्रिपूर्ण लढतीबाबत बोलणारे अनिस अहमद कोण? मैत्रिपूर्ण लढतीचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल. मैत्रिपूर्ण लढत ही घातक आहे, मग सगळीकडेच मैत्रिपूर्ण लढत होईल. नाना पाटोले बोलत असतील तर चांगली गोष्ट आहे. गिरीश महाजन जळगाव वाचवा. त्यांची जागा दाखवण्यासाठी आम्ही शिवसेना उमेदवार उभा केला आहे, असं संजय राऊत म्हणाले.

एकनाथ खडसे भाजपत जाणार?; संजय राऊत म्हणाले…

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे हे पुन्हा भाजपत घरवापसी करणार आहेत. लवकरच त्यांचा भाजपमध्ये प्रवेश होणार आहे. याबाबत संजय राऊत यांना सांगलीत विचारण्यात आलं. तेव्हा त्यांनी यावर उत्तर दिलं आहे. एकनाथ खडसे भाजपात जाणार आहेत, याबाबत मला माहिती नाही. पण भाजपने त्यांच्यावर जे आरोप केले आहेत. त्याचं काय? आता त्यांच्याकडे वेगळी वाशिंग मशीन आली आहे का?, असा सवाल संजय राऊत यांनी विचारला आहे.

Previous Post

मोठी ब्रेकिंग | भिवंडी, सांगलीत मैत्रीपूर्ण लढत होणार?; महाविकास आघाडीला आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का

Next Post

सांगली जिल्हा प्रशासनाला विरोधकाचे मोठे आव्हान..! वाचा सविस्तर

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
सांगली जिल्हा प्रशासनाला विरोधकाचे मोठे आव्हान..! वाचा सविस्तर

सांगली जिल्हा प्रशासनाला विरोधकाचे मोठे आव्हान..! वाचा सविस्तर

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group