सांगली प्रतिनिधी | खबऱ्या ऑनलाईन – सांगली जिल्हा प्रशासनाला निवडणुकीसाठी तयारी करावी लागत आहे. निवडणूक आयोगाला टक्कर देणारा प्रमुख विरोधक म्हणून उन्हाळ्याचा विचार करावा लागत आहे. यंदा निवडणूक ऐन उन्हाळ्यात आली आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यातच तापमानाचा पारा ४० अंशांवर पोहोचला आहे. ७ मे रोजी मतदानावेळी तो आणखी किती वाढेल? याची चिंता प्रशासनाला आहे. अशा रणरणत्या उन्हात मतदारांना प्रचारासाठी घराबाहेर काढण्याचे मोठे आव्हान प्रशासनापुढे आहे. पण मतदानाच्या जास्तीत जास्त टक्केवारीद्वारे ही लढाई जिंकण्याचा आत्मविश्वास प्रशासनाला आहे.
निवडणूक आयोगाच्या प्रचार मोहिमेत खुद्द जिल्हाधिकारी डॉ राजा दयानिधी हे स्वत: उतरले आहेत. निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी स्वीप उपक्रमांतर्गत सर्व स्तरावर नाविण्यपूर्ण उपक्रमाव्दारे जनजागृती करण्याचे आदेश दिले आहेत.

