• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

ब्रेकिंग | सांगलीत नामांकित हॉस्पिटलकडे २५ लाखांच्या खंडणीची मागणी..? तिघांवर गुन्हा दाखल

Admin by Admin
April 1, 2024
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
मोठी ब्रेकिंग | सांगलीतील राजकारणात भूकंप होणार..! काँग्रेसची ही भूमिका.. म्हणाले, “आम्ही…..!”
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सांगली शहरातील नामांकित असणाऱ्या उषःकाल हॉस्पिटल प्रशासनाला २५ लाखाची खंडणी मागणाऱ्या सांगलीतील शाहा कुटुंबियांवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचबरोबर रुग्णालयातून रुग्णही परस्पर पळविल्याची तक्रारही रुग्णालय प्रशासनाकडून करण्यात आली आहे.

गुन्हा दाखल झालेल्यामध्ये राहुल शाह, संपदा शाह आणि यश शाह यांचा समावेश आहे. संबंधित प्रकार समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. सांगली पोलीस या प्रकरणी आता सखोल तपास करत आहेत. पण संबंधित प्रकार समोर आल्यानंतर शहरातील नागरिकांमध्ये या प्रकरणावर जोरदार चर्चा सुरु आहे.

राहुल शहा यांच्या मातोश्री शकुंतला शाह या उषःकाल रुग्णालयात उपचार घेत होत्या. त्यांचे रुग्णालयाचे बिल 39,346 रुपये इतके झाले होते. यावेळी राहुल शाह यांनी आपल्या मातोश्री यांना बिल न भरताच रुग्णालयातून नेले. यानंतर शाह यांनीच पोलिसात रुग्णालयाबाबत तक्रार दिली. संबंधित तक्रार मागे घेण्यासाठी संशयितांनी रुग्णालय व्यवस्थापनाकडे 25 लाखांची खंडणी मागितली, असा आरोप करण्यात आलाय. तशी तक्रार रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. संजय कोगरेकर यांनी दिल्यानंतर विश्रामबाग पोलिसांनी राहुल शाह याच्यासह तिघांवर गुन्हा दाखल केल्याचे रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. संजय कोगरेकर यांनी सांगितले.

संबंधित प्रकरणी आता पोलीस तपासातून काय माहिती समोर येतं ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. रुग्णालय प्रशासनाकडे खरंच 25 लाखांची खंडणी मागण्यात आली का? याचा तपास पोलीस करणार आहेत. तसेच रुग्णालय प्रशासनाकडून करण्यात आलेले आरोप खरे आहेत का? याचा देखील तपास आता पोलिसांकडून करण्यात येणार आहे.

Previous Post

ब्रेकिंग | सांगलीसह चार जिल्ह्यातून ‘या’ला केले तडीपार..!

Next Post

सांगली बाजार समितीचा ‘तो’ कर्मचारी निलंबित, कामावरून सुट्टी करण्यासाठी उशिरा आल्याने झाला होता वाद..

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
सांगली बाजार समितीचा ‘तो’ कर्मचारी निलंबित, कामावरून सुट्टी करण्यासाठी उशिरा आल्याने झाला होता वाद..

सांगली बाजार समितीचा 'तो' कर्मचारी निलंबित, कामावरून सुट्टी करण्यासाठी उशिरा आल्याने झाला होता वाद..

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group