Saturday, June 7, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सांगली बाजार समितीचा ‘तो’ कर्मचारी निलंबित, कामावरून सुट्टी करण्यासाठी उशिरा आल्याने झाला होता वाद..

Admin by Admin
April 1, 2024
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
0
सांगली बाजार समितीचा ‘तो’ कर्मचारी निलंबित, कामावरून सुट्टी करण्यासाठी उशिरा आल्याने झाला होता वाद..

सांगली प्रतिनिधी | खबऱ्या ऑनलाईन : कामावरून सुटी करण्यासाठी उशिरा आल्याच्या कारणावरून दोन कर्मचाऱ्यांमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात वाद झाला. यावेळी संशयित विश्वेश गजानन आंबी (रा. गावभाग, सांगली) याने फरशीच्या तुकड्याने शिपाई सूर्यकांत तुकाराम कदम (रा.कोळीवाडी, कसबे डिग्रज, ता. मिरज) याला मारहाण केली. यानंतरही कर्मचाऱ्यांना धमकावणे आंबी यांच्याकडून सुरूच असल्यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे.

सांगली बाजार समितीचे सभापती सुजय शिंदे आणि सचिव महेश चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीकडे शिपाई म्हणून कार्यरत असलेले सूर्यकांत कदम हे शुक्रवारी (दि. ८) रात्री १० वाजता आवारात थांबले होते. संशयित विश्वेश आंबी आल्यानंतर मला सोडण्यासाठी उशिरा का आलास, अशी फिर्यादीने विचारणा केली. त्यावरून दोघांमध्ये वाद झाला.

तेव्हा आंबी याने तेथे पडलेला फरशीचा तुकडा घेऊन कदम यांना मारहाण केली. यामध्ये कदम जखमी झाले. उपचारानंतर त्यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्यानुसार आंबीविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. त्यानंतरही आंबी यांनी कदम यांना मोबाइलवर फोन करून धमकी देत आहेत. म्हणूनच आंबी यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. चौकशी समिती नेमून पुढील कारवाई करण्यात येणार आहे.

Previous Post

ब्रेकिंग | सांगलीत नामांकित हॉस्पिटलकडे २५ लाखांच्या खंडणीची मागणी..? तिघांवर गुन्हा दाखल

Next Post

आयपीएस अधिकार्‍यांच्या घरी पोलीस शिपाई घरगडी..?

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
आयपीएस अधिकार्‍यांच्या घरी पोलीस शिपाई घरगडी..?

आयपीएस अधिकार्‍यांच्या घरी पोलीस शिपाई घरगडी..?

वार्ता संग्रह

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Gopniykhabarya Live 2014

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

© Gopniykhabarya Live 2014