• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मोठी बातमी |..अखेर ‘सांगली’बाबत उद्धव ठाकरेंनी ताठर भूमिका सोडली; काँग्रेसशी चर्चा करण्यास तयार, लवकरच निघणार तोडगा?

Admin by Admin
April 1, 2024
in पश्चिम महाराष्ट्र, राजकीय
1 min read
0
Big Breaking | विशाल पाटील यांच्या उमेदवारीसाठी ‘हे’ मुंबईत.! अंतिम निर्णय आज दिल्लीत..? काँग्रेसच्या हक्काच्या जागेवर ठाकरेंच्या शिवसेनेचे अतिक्रमण..?
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सांगली प्रतिनिधी | खबऱ्या ऑनलाईन : सांगली लोकसभा मतदारसंघाबाबत शिवसेना नेतृत्वाने अखेर ताठर भूमिका सोडली आहे.

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या जागेबाबत चर्चेची तयारी दर्शवली आहे. दिल्लीतून महाराष्ट्रात आल्यानंतर प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांसह आमदार विश्‍वजित कदम यांच्यासोबत चर्चा करून निर्णय घेण्याचे दिल्लीतील चर्चेत ठरले आहे. आमदार विश्‍वजित कदम यांनी माध्यमांशी बोलताना या वृत्ताला दुजोरा दिला.

दिल्लीत काल इंडिया आघाडीचा मोर्चा निघाला. त्यात सांगलीसह भिवंडी आणि मुंबईतील तीन वादग्रस्त जागांवर चर्चा अपेक्षित होती. सकाळी प्रदेश काँग्रेसचे नेते आणि शिवसेना प्रक्षप्रमुख उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत यांच्यात प्राथमिक चर्चा झाली. शिवसेनेकडून सांगलीवरील दावा सोडला जाणार नाही, असा सकाळी निरोप देण्यात आला होता. काँग्रेस नेत्यांनीही आम्ही सांगली लढतोय, मैत्रीपूर्ण लढत करू, असा निरोप शिवसेनेला दिला. त्यानंतर राष्ट्रीय पातळीवर नेत्यांसोबत उद्धव ठाकरे यांच्याशी प्राथमिक चर्चा झाली असून, त्यांनी सांगली लोकसभा मतदारसंघाबाबत चर्चेची तयारी दर्शवली आहे.

आमदार विश्‍वजित कदम म्हणाले, ”सांगली लोकसभा मतदारसंघ लढवण्याबाबत आम्ही ठाम आहोत. काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड जोश आहे. हे वातावरण नक्कीच काँग्रेसला ताकद देणारे आणि नवी उभारी देणारे आहे. आम्ही शिवसेना नेतृत्वाला आज दिल्लीत त्याची कल्पना दिली आहे. त्यांनी या जागेबाबत चर्चेची तयारी दर्शवली, हे महत्त्वाचे आहे. चर्चेतून नक्कीच मार्ग निघेल आणि महाविकास आघाडीच्या हिताचा निर्णय होईल, अशी मला खात्री आहे.”

Previous Post

सांगलीतील ‘ही’ टोळी दोन वर्षे हद्दपार, टोळीवर गंभीर गुन्हे दाखल

Next Post

सांगली ब्रेकिंग | महिलेवर अत्याचार करणाऱ्या महापालिकेच्या दोन कर्मचाऱ्यांना अटक

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
सांगली | खासगी सावकाराची पिता-पुत्रास मारहाण, दहा लाखांसाठी साडेबारा लाखांची पठाणी वसुली

सांगली ब्रेकिंग | महिलेवर अत्याचार करणाऱ्या महापालिकेच्या दोन कर्मचाऱ्यांना अटक

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group