• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

दुःखद बातमी | शेकाप नेत्या, माजी मंत्री मीनाक्षी पाटील यांचे निधन

Admin by Admin
March 29, 2024
in राजकीय
0
दुःखद बातमी | शेकाप नेत्या, माजी मंत्री मीनाक्षी पाटील यांचे निधन
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

शेतकरी कामगार पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या, माजी मंत्री मीनाक्षी पाटील यांचे आज (दि.२९) निधन झाले. त्या दीर्घकाळ आजारी होत्या. त्यांच्यावर आज पेझारी येथे दुपारी २ वाजता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.शेतकरी कामगार पक्षाच्या झुंजार नेत्या अशी त्यांची ओळख होती.

माहितीनुसार, शेतकरी कामगार पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या, माजी मंत्री मीनाक्षी पाटील यांचे आज निधन झाले. त्यांनी वयाच्या ७६ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्या अलिबाग विधानसभा मतदार संघाच्या १९९५, १९९९ आणि २००९ अशा 3 वेळा त्या आमदार होत्या. १९९९ मध्ये तत्कालीन विलासराव देशमुख सरकारमध्ये त्या काही काळ विकास राज्यमंत्री म्हणून कार्यरत होत्या. रायगड जिल्ह्यात प्रकल्प विरोधी अनेक लढ्यात त्यांचा सहभाग होता. शेकापचे आ. जयंत पाटील, माजी आमदार पंडित पाटील यांच्या त्या भगिनी होत. तर शेकाप नेते आस्वाद पाटील यांच्या त्या मातोश्री होत. मीनाक्षी पाटील यांच्या निधनाबद्दल राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातून शोक प्रकट केला जात आहे. एक अभ्यासू नेत्या अशी त्यांची ख्याती होती.

Previous Post

‘काँग्रेस व दादा घराणे’ दोन्हींच्या अस्तित्वाची लढाई, जिल्ह्यातील काँग्रेसला ‘ही’ अखेरची संधी..? कार्यकर्ते काय म्हणतात..! वाचा सविस्तर..!

Next Post

सांगली लोकसभेचा वाद, कोल्हापुरात पडसाद; काँग्रेस- ठाकरे गटात धुसफूस वाढली.!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
सांगली लोकसभेचा वाद, कोल्हापुरात पडसाद; काँग्रेस- ठाकरे गटात धुसफूस वाढली.!

सांगली लोकसभेचा वाद, कोल्हापुरात पडसाद; काँग्रेस- ठाकरे गटात धुसफूस वाढली.!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group