• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सांगली लोकसभेचा वाद, कोल्हापुरात पडसाद; काँग्रेस- ठाकरे गटात धुसफूस वाढली.!

Admin by Admin
March 30, 2024
in पश्चिम महाराष्ट्र, राजकीय
1 min read
0
सांगली लोकसभेचा वाद, कोल्हापुरात पडसाद; काँग्रेस- ठाकरे गटात धुसफूस वाढली.!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सांगली लोकसभेच्या जागेवरुन महाविकास आघाडीमधील काँग्रेस आणि ठाकरे गटामध्ये कलह सुरू आहे. ठाकरे गटाकडून सांगलीमध्ये उमेदवारी जाहीर करण्यात आली असून काँग्रेसने या उमेदवारीला विरोध केला आहे.अशातच आता सांगलीच्या जागेवरुन सुरू असलेल्या वादाचे कोल्हापुरात पडसाद उमटल्याचे पाहायला मिळत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सांगली लोकसभा मतदारसंघात चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारीवरून शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. ठाकरे गटप्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मेळाव्याकडे काँग्रेस कार्यकर्त्यांनी फिरवलेली पाठ त्याला कारणीभूत ठरली आहे.

जोपर्यंत काँग्रेसचे विशाल पाटील ‘मशाल’ हातात धरत नाहीत, तोपर्यंत शिवसेना ठाकरे गटाने महाविकास आघाडीच्या उमेदवारांचे प्रचार थांबवावेत, असे तोंडी आदेश ‘मातोश्री’वरून निघाल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे. त्याचे पडसाद आता कोल्हापुरातील शिवसेना ठाकरे गटातील प्रमुखांपेक्षा होम पिचवर लढणाऱ्या स्थानिक शिवसैनिकांमध्ये उमटत आहेत.

जर सांगलीमध्ये महाविकास आघाडी म्हणून मदत करणार नसतील तर आपण ही मदत का करायची? अशी भावना कोल्हापुरातील शिवसैनिकांच्या मनात निर्माण होत आहे. तसेच महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार शाहू महाराज छत्रपती यांच्या प्रचाराकडेही शिवसैनिकांनी पाठ फिरवल्याचे सांगण्यात येत आहे.

Previous Post

दुःखद बातमी | शेकाप नेत्या, माजी मंत्री मीनाक्षी पाटील यांचे निधन

Next Post

सांगलीतील ‘ही’ टोळी दोन वर्षे हद्दपार, टोळीवर गंभीर गुन्हे दाखल

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
सांगलीतील ‘ही’ टोळी दोन वर्षे हद्दपार, टोळीवर गंभीर गुन्हे दाखल

सांगलीतील 'ही' टोळी दोन वर्षे हद्दपार, टोळीवर गंभीर गुन्हे दाखल

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group