• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सांगली ब्रेकिंग | स्मशानभूमीतील धक्कादायक प्रकार समोर : काळी कपडे उघडताच हादरले लोक, पोलिसांना बोलावलं

Admin by Admin
March 28, 2024
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
मोठी ब्रेकिंग | सांगलीतील राजकारणात भूकंप होणार..! काँग्रेसची ही भूमिका.. म्हणाले, “आम्ही…..!”
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सांगली प्रतिनिधी | खबऱ्या ऑनलाईन – इस्लामपूर येथील चिकुर्डेला जाणाऱ्या रोडवर स्मशानभूमी आहे. या स्मशानभूमीमध्ये जिथे मृतदेहाला अग्नि दिला जातो, त्या रॅकला कुणीतरी अज्ञात व्यक्तीने काही वस्तू अडकवल्या होत्या.

काळ्या कपड्यामध्ये हळद कुंकू लावून नारळ, बाहुल्या, बीबे, कवाळ, काळ्या बाहुल्या त्यावर मुलीचे फोटो लावून धारदार दाभन खुपसण्याचा अघोरी प्रकार उघडकीस आला आहे. होळी पौर्णिमेपासून रस्त्याच्या लगत असणार्‍या स्मशानभूमीत हा प्रकार सुरू होता. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी स्मशानभूमीत धाव घेत हा प्रकार उघडकीस आणला आहे.

स्मशानभूमीत बांधलेली काळी गाठोडी, यामध्ये लिंबू, काळ्या जादूचे साहित्य व मुलींचे फोटो असे मिळून आले..

ह्या अघोरी प्रकार करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिकांमधून केली जात आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी पोलीस पाटलांच्या समक्ष काळ्या कापडातील लटकत्या बाहुल्या आणि इतर साहित्य काढलं. आत पाहिल्यावर धक्कादायक प्रकार उघडकीस आला. कापड सोडल्यावर त्यातून नारळ, त्यावर काळी बाहुली, लिंबु आणि मुलींच्या रंगीत फोटोला टोकदार दाभनातून नारळात खुपसल्याचं दिसलं. तर नारळाला लाल रंगाचा दोरा गुंडाळून त्यात कागदी चिठ्या टाकल्या होत्या. त्या उघडून पाहिल्यावर कागदावर मुलीचं नाव लिहिलेलं दिसलं. अशी पाच गाठोडी आहेत. यात पाच वेगवेगळ्या मुलींचे फोटो आणि नावं आहेत.

एका कागदावर एका मुलाचं नाव आहे. हे सर्व साहित्य पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रधान सचिव संजय बनसोडे, कार्यकर्ते निवृत्त उपप्राचार्य बी.आर. जाधव, निवृत्त प्राचार्य डॉ.सुदाम माने, विनोद मोहिते यांनी हा नेमका काय प्रकार आहे हे उघडकीस आणला. यानंतर उपस्थित नागरिकांचे प्रबोधन करून स्मशानभूमीची स्वच्छता केली.

कुरळप पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज सरनोबत म्हणाले, या प्रकाराचे गांभीर्य लक्षात घेऊन याचा खोलवर तपास करू. कोणत्याही मुलींची ओळख जाहीर न करता गोपनीय तपास करून दोषींवर गुन्हे दाखल करू, असं आश्वासन पोलिसांनकडून देण्यात आलं आहे.

Previous Post

ड्युटीवर जाणाऱ्या मुंबई पोलीसाचा गर्दीमुळे लोकलमधून पडून मृत्यू..

Next Post

‘काँग्रेस व दादा घराणे’ दोन्हींच्या अस्तित्वाची लढाई, जिल्ह्यातील काँग्रेसला ‘ही’ अखेरची संधी..? कार्यकर्ते काय म्हणतात..! वाचा सविस्तर..!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
‘काँग्रेस व दादा घराणे’ दोन्हींच्या अस्तित्वाची लढाई, जिल्ह्यातील काँग्रेसला ‘ही’ अखेरची संधी..? कार्यकर्ते काय म्हणतात..! वाचा सविस्तर..!

'काँग्रेस व दादा घराणे' दोन्हींच्या अस्तित्वाची लढाई, जिल्ह्यातील काँग्रेसला 'ही' अखेरची संधी..? कार्यकर्ते काय म्हणतात..! वाचा सविस्तर..!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group