• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मोठी ब्रेकिंग | रामदास आठवले यांच्या वाहनाला कंटेनरची धडक, साताऱ्याच्या वाईजवळ भीषण अपघात

Admin by Admin
March 21, 2024
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, राजकीय
0
पलूसचा तलाठी ३२ हजारांची लाच स्वीकारताना जाळ्यात, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या गाडीचा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. रामदास आठवले यांच्या वाहनाला कंटेनरने धडक दिली. या अपघातात रामदास आठवले यांच्या गाडीचं मोठं नुकसान झालं आहे.

सुदैवाने रामदास आठवले या अपघातातून सुखरुप बचावले आहेत. त्यांना कोणत्याही प्रकारची इजा झालेली नाही. अपघातानंतर रामदास आठवले दुसऱ्या वाहनाने मुंबईच्या दिशेला रवाना झाले आहेत. साताऱ्यातील वाईजवळ ही अपघाताची घटना घडली आहे. रामदास आठवले वाईहून मुंबईच्या दिशेला येत होते. या दरम्यान एका कंटेनरने त्यांच्या गाडीला धडक दिली.

रामदास आठवले यांच्या वाहनाच्या अपघाताची माहिती समोर आल्यानंतर त्यांच्या समर्थक आणि कार्यकर्त्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. रामदास आठवले सुखरुप आहेत ना? अपघाताची घटना नेमकी कशी झाली? रामदास आठवले आता कुठे आहेत? असे अनेक प्रश्न त्यांच्या समर्थक आणि कार्यकर्त्यांच्या मनात उपस्थित होत आहेत. रामदास आठवले यांच्याकडून अद्याप तरी अधिकृतपणे अपघातानंतर कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. कदाचित ते थोड्या वेळाने त्यांच्या अधिकृत फेसबुक किंवा ट्विटर अकाउंटवर याबाबत माहिती देतील. पण ते सुखरुप असल्याची माहिती मिळत आहे. काळजी करण्यासारखं काही नाही. रामदास आठवले मुंबईत आल्यानंतर कदाचित माध्यमांशी संवाद साधतील तेव्हा अपघाताबद्दल सविस्तर माहिती देऊ शकतात.

Previous Post

मोठी ब्रेकिंग | काँग्रेसची बैठक संपली; महाराष्ट्रातील संभाव्य उमेदवारांची यादी समोर..

Next Post

सांगली | उद्धव ठाकरेंची ग्वाही सोबत प्रवासाची..! वसंतदादा पाटील यांना अभिवादन

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
सांगली | उद्धव ठाकरेंची ग्वाही सोबत प्रवासाची..! वसंतदादा पाटील यांना अभिवादन

सांगली | उद्धव ठाकरेंची ग्वाही सोबत प्रवासाची..! वसंतदादा पाटील यांना अभिवादन

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group