Friday, June 6, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मोठी ब्रेकिंग | काँग्रेसची बैठक संपली; महाराष्ट्रातील संभाव्य उमेदवारांची यादी समोर..

Admin by Admin
March 20, 2024
in राजकीय
0
मोठी ब्रेकिंग | काँग्रेसची बैठक संपली; महाराष्ट्रातील संभाव्य उमेदवारांची यादी समोर..

Congress Candidate List ( गोपनीय खबऱ्या ) : लोकसभा निवडणुकांची घोषणा झाल्याने सर्वच राजकीय पक्षांच्या गोटात जोरदार हालचाली सुरू आहेत. राज्यात महाविकास आघाडीतील एकाही पक्षाने अद्याप आपल्या उमेदवारांची घोषणा केलेली नाही.

मात्र आज काँग्रेसच्या निवडणूक समितीची नवी दिल्ली येथे एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली असून या बैठकीत महाराष्ट्रातील काही उमेदवार निश्चित करण्यात आल्याची माहिती आहे. राज्यात काँग्रेस महाविकास आघाडीच्या माध्यमातून या निवडणुकीला सामोरे जाणार आहे. त्यामुळे आघाडीच्या जागावाटपात ज्या जागा काँग्रेसला मिळण्याची शक्यता आहे, त्या जागांवरील उमेदवारांबाबत आजच्या बैठकीत चर्चा झाल्याचे समजते.

नवी दिल्ली येथे काँग्रेस मुख्यालयात झालेल्या बैठकीला काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे संघटन महासचिव के. सी. वेणूगोपाल, प्रभारी रमेश चेन्नीथला, माजी केंद्रीय मंत्री अंबिका सोनी, सलमान खुर्शीद, मधुसूदन मिस्त्री पी.एल. पुनिया यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. या बैठकीला महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि बाळासाहेब थोरात उपस्थित होते. बैठकीत काही नावांबाबत एकमत झाल्याची माहिती आहे.

काँग्रेसच्या संभाव्य उमेदवारांची यादी

नागपूर – विकास ठाकरे
नांदेड – वसंत चव्हाण
लातूर – शिवाजी काळगे
नंदुरबार – के.सी.पाडवी
गडचिरोली – नामदेव उसेंडी
कोल्हापूर – शाहू महाराज छत्रपती
सोलापूर – प्रणिती शिंदे
पुणे – रविंद्र धंगेकर
अमरावती – बळवंत वानखेडे

दरम्यान, या उमेदवारांबाबत काँग्रेसकडून अद्याप अधिकृतरित्या माहिती देण्यात आलेली नसली तरी कोणत्याही क्षणी आम्ही उमेदवारांची घोषणा करू, असं के. सी. वेणूगोपाल यांनी सांगितलं आहे.

Previous Post

धक्कादायक | एमबीबीएसच्या १३ विद्यार्थिनींचा प्राध्यापकांकडून लैंगिक छळ…!

Next Post

मोठी ब्रेकिंग | रामदास आठवले यांच्या वाहनाला कंटेनरची धडक, साताऱ्याच्या वाईजवळ भीषण अपघात

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
पलूसचा तलाठी ३२ हजारांची लाच स्वीकारताना जाळ्यात, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

मोठी ब्रेकिंग | रामदास आठवले यांच्या वाहनाला कंटेनरची धडक, साताऱ्याच्या वाईजवळ भीषण अपघात

वार्ता संग्रह

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Gopniykhabarya Live 2014

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

© Gopniykhabarya Live 2014