• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सांगली | काँग्रेसचा ‘विशाल ‘ तर ‘चंद्रहार’ची मशाल..! मार्ग निघेना तिढा सुटेना ! ठाकरे गट की काँग्रेस, महाविकास आघाडीत रस्सीखेच..

Admin by Admin
March 16, 2024
in पश्चिम महाराष्ट्र, राजकीय
1 min read
0
सांगली | काँग्रेसचा ‘विशाल ‘ तर ‘चंद्रहार’ची मशाल..! मार्ग निघेना तिढा सुटेना ! ठाकरे गट की काँग्रेस, महाविकास आघाडीत रस्सीखेच..
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

Loksabha Election : Gopniy khabarya live online लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील वातावरण चांगलच तापल्याचं पाहायला मिळत आहे. भाजपने आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केलीय. मात्र, अद्याप महाविकास आघाडीकडून उमेदवारांची यादी जाहीर झालेली नाही.

काही जागांवरुन महाविकास आघाडीत तिढा कायम असल्याची माहिती मिळतेय. महाविकास आघाडीच्या जागावाटपात सांगली आणि रामेटक या दोन जागावरील तिढा कायम आहे. या दोन्ही जागांसाठी ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यात रस्सीखेच असल्याचं पाहायला मिळत आहे.

महाविकास आघाडीत सांगली आणि रामटेकच्या जागांवरुन तिढा कायम आहे. सांगली आणि रामटेक या दोन्ही जागेवरती शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसनं दावा केलाय. या दोन्ही जागांवरती काल चर्चा झाली होती. मात्र, मार्ग निघाला नाही, त्यामुळं आज पुन्हा एकदा यावर चर्चा होणार असल्याची माहिती मिळतेय.

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. वसंतरावदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील हे काँग्रेस कडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. तर शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून पैलवान चंद्रहार पाटील यांनीही तयारी दर्शवली आहे. २१ मार्च रोजी सांगलीतील मिरज शहरात उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे. महाविकास आघाडीकडून सांगली लोकसभेसाठी उमेदवारीचा तिढा मात्र कायम असल्याने याचा फायदा विरोधकांना होण्याची शक्यता आहे.

Previous Post

Maharashtra School – मोठी बातमी | राज्यातील सर्व शाळांमध्ये शिक्षकांसाठी ड्रेस कोड लागू होणार, नावाच्या आधी Tr. लागणार

Next Post

बिग ब्रेकिंग | ‘या’ पदांसाठी घेण्यात आलेली भरती प्रक्रिया रद्द..! उडाली खळबळ

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
सांगली | खासगी सावकाराची पिता-पुत्रास मारहाण, दहा लाखांसाठी साडेबारा लाखांची पठाणी वसुली

बिग ब्रेकिंग | 'या' पदांसाठी घेण्यात आलेली भरती प्रक्रिया रद्द..! उडाली खळबळ

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group