• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

गौप्यस्फोट | अजित पवारांच्‍या आधी जयंत पाटलांना भाजपची ऑफर..?

Admin by Admin
February 23, 2024
in पश्चिम महाराष्ट्र, मंत्रालय, राजकीय
1 min read
0
गौप्यस्फोट | अजित पवारांच्‍या आधी जयंत पाटलांना भाजपची ऑफर..?
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सांगली प्रतिनिधी | खबऱ्या ऑनलाईन – अजित पवारांच्या आधी जयंत पाटील यांना भाजपकडून उपमुख्यमंत्री पदाची ऑफर देत भाजपमध्‍ये प्रवेश करण्‍याची विनंती करण्यात आली होती, असा गौप्यस्फोट जयंत पाटील यांचे विश्वासू सहकारी व राजारामबापू साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष पी.आर. पाटील यांनी केला.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही ऑफर दिली होती, असा दावाही त्‍यांनी केला. दीड वर्षांपूर्वी फडणवीस यांनी जयंत पाटलांना ही ऑफर दिली होती आणि या ऑफरबाबत खुद्द जयंत पाटलांनी आपल्यासह सहकाऱ्याशी चर्चा देखील केली होती, असेही ते म्हणाले.

सांगली येथील कुरळपमध्ये एका कार्यक्रमात ते बोलत होते. पी आर पाटील म्‍हणाले, जयंत पाटलांनी शरद पवारांसोबत राहण्याचा निर्धार करत फडणवीस यांची ऑफर धुडकावून लावली होती. आताही जयंत पाटलांच्या बाबतीत सुरू असणाऱ्या अफवा असून त्यावर कोणी विश्वास ठेवू नये, असे आवाहनही त्यांनी केले.

दरम्‍यान, जयंत पाटील यांच्या भाजपत जाण्याची चर्चा सुरू झाल्यावर जयंत पाटलांनी आपण भाजपात जाणार नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. त्यामुळे जयंत पाटलांच्या भाजप प्रवेशावर तुर्त पडदा पडलेला असताना आता त्यांचेच विश्वासू सहकाऱ्यांनी केलेल्या गौप्यस्फोटामुळे पुन्‍हा नव्‍याने चर्चा सुरू झाल्‍या आहेत.

Previous Post

मिरजेत पोलीस असल्याचे सांगत लुटणाऱ्या दोघांना अटक

Next Post

मोठी ब्रेकिंग | जयंत पाटील एकटे जाणार की “सगेसोयरे” घेऊन जाणार? प्राजक्त तनपुरेंचं मोठं वक्तव्य

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मोठी ब्रेकिंग | जयंत पाटील एकटे जाणार की “सगेसोयरे” घेऊन जाणार? प्राजक्त तनपुरेंचं मोठं वक्तव्य

मोठी ब्रेकिंग | जयंत पाटील एकटे जाणार की "सगेसोयरे" घेऊन जाणार? प्राजक्त तनपुरेंचं मोठं वक्तव्य

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group