• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

Sangli police detection – nagaj murder case पत्नीशी अनैतिक संबंध व आर्थिक कारणातून खून झाल्याचे स्पष्ट..!

नागज घाटातील रहस्यमय खून प्रकरणी कर्नाटकातील चौघांना अटक : सांगली पोलिसांचा जबरदस्त तपास

Admin by Admin
February 17, 2024
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
Sangli police detection – nagaj murder case पत्नीशी अनैतिक संबंध व आर्थिक कारणातून खून झाल्याचे स्पष्ट..!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

क्राईम डायरी | गोपनीय खबऱ्या | ऑनलाईन प्रतिनिधी : कवठेमहांकाळ तालुक्यातील नागज घाटातील खूनाचे गूढ उकलण्यात सांगली पोलिसांना यश आले असून कर्नाटकातील विजयपूरच्या चौघांना अटक करण्यात आल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी शुक्रवारी दिली.

विजयपूरच्या तरुणाचा अनैतिक संबंध आणि आर्थिक कारणातून खून झाल्याचे चौकशीत निष्पन्न झाल्याचेही त्यांनी सांगितले.

नागज घाटामध्ये दि. १० फेब्रुवारी रोजी अज्ञाताचा मृतदेह अर्धवट जळालेल्या स्थितीत आढळून आला होता. त्याचा चेहरा विद्रुप करण्याबरोबरच डिझेल टाकून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. या घटनेची गांभीर्याने दखल घेत अधीक्षक संदीप घुगे यांनी घटनास्थळी भेट देऊन तातडीने तपास करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

कवठेमहांकाळ पोलीस ठाण्याचे निरीक्षक संदीप कोळेकर व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या संयुक्त पथकाने या खुनाची उकल सहा दिवसांत करून संशयितांना गजाआड केले. या प्रकरणी कर्नाटकातील विजयपूरमधील मो. रफीक शब्बीर महंमदापूर (वय ३२), यासीन अन्वर बल्लारी (वय ३०), मोसीन अन्वर बल्लारी (वय २८) आणि अल्लाउद्दीन मेहबूबसाब बावर्ची (वय २७, सर्व रा. ख्वॉजा मस्जिद, जेल दर्गा परिसर) या चार संशयितांना काल अटक करण्यात आली.

यातील मुख्य संशयित महंमदापूर यांने दिलेल्या माहितीनुसार, शरीफ हसनसाब गनवार याला विजयपूर येथे मारहाण करून त्याचा गळा आवळून व छातीवर चाकूने वार करून खून करण्यात आला. पार्थिव नागज घाटात मोटारीने आणून डिझेल टाकून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. मृताच्या पत्नीशी असलेल्या अनैतिक संबंधातून आणि आर्थिक कारणातून हा खून साथीदारकडून केला असल्याची कबुलीही संशयितांने पोलिसांना दिली आहे.

Previous Post

ब्रेकिंग | अधिष्ठाता डॉ. प्रकाश गुरव यांची उचलबांगडी : पुन्हा मिरजेला बदली..!

Next Post

मिरजेत दोन मोबाईल चोरट्यांना अटक ; चोरीचे १७ मोबाईल हस्तगत

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मिरजेत दोन मोबाईल चोरट्यांना अटक ; चोरीचे १७ मोबाईल हस्तगत

मिरजेत दोन मोबाईल चोरट्यांना अटक ; चोरीचे १७ मोबाईल हस्तगत

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group