• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

MURDER – sangli RTI member | रक्तबंबाळ अवस्थेत कारमध्ये आढळला मृतदेह, सांगलीतील आरटीआय कार्यकर्ते संतोष कदमचा खून..!

Admin by Admin
February 8, 2024
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
MURDER – sangli RTI member | रक्तबंबाळ अवस्थेत कारमध्ये आढळला मृतदेह, सांगलीतील आरटीआय कार्यकर्ते संतोष कदमचा खून..!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

कुरुंदवाड-नांदणी दरम्यानच्या रस्त्यावर गट क्रमांक १०१२/१ यांच्या शेतालगत अनोळखी स्विफ्ट कारमध्ये संतोष विष्णू कदम (वय ३६, रा. गावभाग सांगली) या युवकाची धारदार चाकूने हत्या करण्यात आली.

ड्रायव्हर लगत असणाऱ्या सीटवर संतोष यांचा मृतदेह आढळून आला. अज्ञात मारेकऱ्यांनी पलायन केले आहे. दरम्यान, पोलिसांनी पंचनामा करत असताना वाहनांमध्ये दोन धारदार चाकू आणि गाडीच्या पाठीमागे दोन स्पोर्ट्स बूट आणि संतोष कदम यांचा झटापटीमध्ये फुटलेला मोबाईल वाहनात मिळून आला आहे.

नांदणी रस्ता हा रहदारीचा असल्याने पेट्रोल संपले म्हणून कुणीतरी गाडी लावून गेला असावा, असे समजून कोणीही लक्ष दिले नाही. पहाटे सहा वाजल्यापासून ही गाडी रस्त्यावर थांबून होती. १२ वाजण्याच्या सुमारास शेतकऱ्यांनी डोकावून पाहिले असता रक्तबंबाळ अवस्थेतील मृतदेह दिसून आल्याने कुरुंदवाड पोलिसांना माहिती दिली.

घटनास्थळी तात्काळ सपोनी रविराज फडणीस पोलीस फाट्यासह दाखल झाले. काही क्षणातच पोलीस उपाधीक्षक समीरसिंह साळवे, सांगली शहरचे पोलीस निरीक्षक विजय मोरे, गुन्हे अन्वेषण विभाग, फॉरेन्सिक तपासणी केंद्राचे आणि स्वामी पथक घटनास्थळी दाखल होऊन तपासाची चक्री गतिमान केली आहेत.

तथापि फॉरेन्सिक लॅबच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत वाहनाची दरवाजे खुली करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. वाहनातून दोन धारदार चाकू, स्पोर्ट्स बूट जप्त करण्यात आले आहेत. मोबाईल फुटलेल्या अवस्थेत मिळून आला असल्याने खुनावेळी झटापट झाल्याचे दिसते.

Previous Post

ब्रेकिंग | अजित पवारांना धक्का..?

Next Post

कुपवाड | भाई नेरुरकर राज्य खो-खो : किशोर-किशोरी गटात सांगली तर पुरुष-महिला गटात पुण्याला विजेतेपद

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
कुपवाड | भाई नेरुरकर राज्य खो-खो : किशोर-किशोरी गटात सांगली तर पुरुष-महिला गटात पुण्याला विजेतेपद

कुपवाड | भाई नेरुरकर राज्य खो-खो : किशोर-किशोरी गटात सांगली तर पुरुष-महिला गटात पुण्याला विजेतेपद

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group