• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

त्या ‘गोंधळी’ ने घातला बनावट तिकिटांचा ‘गोंधळ’..! ३ लाखांचा प्रशासनास गंडा ; रंगेहात सापडल्यावर गोंधळला..!

Admin by Admin
January 26, 2024
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
त्या ‘गोंधळी’ ने घातला बनावट तिकिटांचा ‘गोंधळ’..! ३ लाखांचा प्रशासनास गंडा ; रंगेहात सापडल्यावर गोंधळला..!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

लांब पल्ल्याच्या प्रवासात खपवली बनावट तिकिटे, एसटी वाहकाकडून तीन लाखांचा गंडा

ईस्लामपूर : इस्लामपूर एसटी आगारातील वाहकाने अधिकृत तिकीट मशीन न वापरता बनावट मोबाइल प्रिंटरचा वापर करून एसटी महामंडळास अंदाजे दोन ते तीन लाखाला गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

या घटनेने आगारात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी वाहक विवेक रमेश गोंधळी (वय २६, रा. कोरेगाव, ता. वाळवा) याच्याविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

नंदकुमार जगन्नाथ जाधव (वय ५६, रा. वाळवा) या आगारातील कर्मचाऱ्याने फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, विवेक गोंधळी हा इस्लामपूर आगारातून नाशिक, मुंबई, पुणे, सांगली, कराड तसेच ग्रामीण भागात वाहतुकीदरम्यान वाहक म्हणून सेवा करत होता. या नेमलेल्या कर्तव्यादरम्यान गोंधळी हा शासकीय इबीक्स कंपनीच्या मशीनद्वारे तिकीट न देता त्याच्याजवळ असलेल्या अवैध कंपनीच्या मोबाइल प्रिंटरद्वारे मोबाइलमध्ये बनावट तिकीट तयार करून त्याची प्रिंट काढून प्रवाशांना देत होता. या तिकिटाचे पैसे ठकसेन गोंधळी हा स्वत:जवळ ठेवून घेत होता. या माध्यमातून तो शासनाची व राज्य परिवहन महामंडळाची फसवणूक करत होता.

गोंधळी याच्या कारनाम्याची माहिती एसटी प्रशासनाच्या निदर्शनास आली. त्याने बनावट तिकीट बनवून शासकीय तिकिटांचे बनावटीकरण केल्याचा ठपका ठेवत त्याच्याविरुद्ध पोलिसांत फिर्याद देण्यात आली आहे. त्यानुसार गोंधळी याच्याविरुद्ध फसवणुकीचा आणि ठकबाजीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

ऑगस्ट २०२३ पासून गोंधळी हा बनावटगिरी करत असल्याची माहिती पुढे आली आहे. जवळपास तीन लाख रुपयांना त्याने गंडा घातल्याचे प्राथमिक चौकशीत पुढे आले आहे. इस्लामपूर पोलिस अधिक तपास करत आहेत.

तपासणीत सापडला..

सांगलीच्या विभागीय कार्यालयातील अधिकारी शाहिद भोकरे यांनी १० डिसेंबर २०२३ ला अचानकपणे कराड-सांगली मार्गावर बसची तपासणी केली होती. त्यावेळी गोंधळी त्याच्याकडे ट्रेमध्ये जुनी मशीन, चार्जर, प्रिंटर, चार्जर पिना असे साहित्य आढळून आले होते. भोकरे यांना गोंधळीचे वर्तन संशयास्पद वाटल्याने त्यांनी त्याच्याकडे कसून चौकशी केली. त्यावेळी गोंधळी याने हा बनावट तिकिटे खपवून त्या पैशावर डल्ला मारत असल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याला अटक केली असून न्यायालयाने २६ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

Previous Post

Live Update । मोठी बातमी! जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, पायाला सूज, तापही भरला; माथाडी भवन येथील सभा रद्द

Next Post

मोठी ब्रेकिंग ! मनोज जरांगे यांच्या सर्व मागण्या मान्य; मंत्री दिपक केसरकरांनी दिली माहिती

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
सांगली | खासगी सावकाराची पिता-पुत्रास मारहाण, दहा लाखांसाठी साडेबारा लाखांची पठाणी वसुली

मोठी ब्रेकिंग ! मनोज जरांगे यांच्या सर्व मागण्या मान्य; मंत्री दिपक केसरकरांनी दिली माहिती

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group