• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मीरारोड प्रकरणी आतापर्यंत 15 जणांना अटक, नितेश राणे आज मीरा रोडला जाणार

Admin by Admin
January 23, 2024
in क्राईम, राजकीय, सामाजिक
1 min read
0
मीरारोड प्रकरणी आतापर्यंत 15 जणांना अटक, नितेश राणे आज मीरा रोडला जाणार
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

ठाणे : भाजप आमदार नितेश राणे आज मीरा रोडला जाणार आहे. मीरा रोडमध्ये झालेल्या वादामुळं नितेश राणे संध्याकाळी मीरा रोडला जाणार आहे. स्वत:नितेश राणेंनी ट्वीट करत ही माहिती दिली आहे.

मीरा भाईंदरप्रकरणी आतापर्यंत 13 आरोपींना अटक करण्यात आली आहे. सीसीटिव्ही फूटेज तापसल्यानंतर आणखी लोकांवर कारवाई होणार असून अशा गोष्टी खपवून घेतल्या जाणार नाही, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

मीरा रोडच्या नया नगर परिसरात रविवारी (21 जानेवारी) रात्री साडेअकराच्या सुमारास दोन गटांमध्ये झालेल्या हाणामारी प्रकरणात स्थानिक पोलिसांनी 15 जणांना अटक केली. या घटनेच्या पार्श्वभूमीवर नया नगर परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसंच बॅरिकेडिंगच्या माध्यमातून पोलीस प्रत्येक वाहनावर लक्ष ठेवून आहेत. सध्या मीरा रोड परिसरात तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

सरनाईकांची 25 जानेवारीला मिरा भाईंदर बंदची हाक

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मिरा भाईंदर वसई विरार आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांची भेट घेऊन, नया नगर परिसरात कोम्बिंग ऑपरेशन करण्याची आणि सर्व आरोपींना 48 तासांत अटक करण्याची मागणी केली आहे. मिरा भाईंदर शहरात जातीय तणाव निर्माण करण्याचा कुणाचा तरी प्रयत्न असल्याचा सरनाईकांचा आरोप आहे. या प्रकरणातल्या आरोपींनी वेळेत अटक झाली नाही तर सरनाईकांनी 25 जानेवारीला मिरा भाईंदर बंदची हाक दिली आहे.

उद्या मीरा रोड..

भेटू मग..

जय श्री राम 🚩

— Nitesh Rane (@NiteshNRane) January 22, 2024

 

कडक कारवाई करणार

मीरा भाईंदरप्रकरणी आतापर्यंत 13 आरोपींना अटक करण्यात आली आहे. सीसीटिव्ही फूटेज तापसल्यानंतर आणखी लोकांवर कारवाई होणार आहे. तर कुठल्याही परिस्थितीत अशा गोष्टी खपवून घेतल्या जाणार नाही. तसेच या प्रकरणी अंत्यत कडक कारवाई केली जाणार आहे. अवैध बांधकाम व धंदे असेल ते बंद होईल, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन

लोकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता पुन्हा तणाव निर्माण होऊ नये यासाठी परिसरात पोलिसांनी बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. तसेच सोशल मीडियावर पसरणाऱ्या अफवा लक्षात घेता हा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

Previous Post

मोठी ब्रेकिंग | पहिल्याच दिवशी रामललाच्या दर्शनासाठी प्रचंड गर्दी, चेंगराचेंगरी सारखी स्थिती, पहा VIDEO

Next Post

जबरदस्त…AI ची कमाल! प्राण प्रतिष्ठेनंतर प्रभू श्रीराम हसऱ्या चेहऱ्याने आपल्या भाविकांना न्याहाळतानाचा व्हिडिओ व्हायरल..! पहा व्हिडिओ.

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
सांगली | खासगी सावकाराची पिता-पुत्रास मारहाण, दहा लाखांसाठी साडेबारा लाखांची पठाणी वसुली

जबरदस्त...AI ची कमाल! प्राण प्रतिष्ठेनंतर प्रभू श्रीराम हसऱ्या चेहऱ्याने आपल्या भाविकांना न्याहाळतानाचा व्हिडिओ व्हायरल..! पहा व्हिडिओ.

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group