खबऱ्या ऑनलाईन – रामलला विराजमान झाले आहेत. आज सकाळी 8 वाजल्यापासून राम भक्तांना दर्शन मिळेल. श्रीराम जन्मभूमि तीर्थ क्षेत्र ट्रस्टने रामललाच्या दर्शन पूजनासाठी नियमावली बनवली आहे. या नियमावलीनुसार आधी सुरु होतं, त्या प्रमाणेच पाचवेळा आरती होईल.
#WATCH | Ayodhya, Uttar Pradesh: Heavy rush outside the Ram Temple as devotees throng the temple to offer prayers and have Darshan of Shri Ram Lalla on the first morning after the Pran Pratishtha ceremony pic.twitter.com/gQHInJ5FTz
— ANI (@ANI) January 23, 2024
याची सुरुवात पहाटे 4 वाजल्यापासून श्रृंगार आरतीने होईल. संध्याकाळी 7 वाजता संध्या आरती होईल. याच प्रकारे रात्री 10 वाजता शयन आरतीनंतर मंदिराचे दरवाजे बंद होतील. भक्तांसाठी रामललाचा दरबार सकाळी 8 वाजता सुरु होईल.
त्यानंतर भक्तगण पूर्ण श्रद्धेने आपल्या आराध्यच दर्शन घेऊ शकतील. ट्रस्टने जारी केलेल्या निर्देशानुसार, आज दुपारी 1 ते 3 वाजेपर्यंत रामललांचे दर्शन बंद राहणार आहे. श्रीराम जन्मभूमि तीर्थ क्षेत्र ट्रस्टनुसार दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास रामललाची मध्यान्ह भोग आरती होईल. त्यासाठी दरवाजे बंद होतील. या दरम्यान रामललाच्या दर्शन पूजनासाठी राम मंदिर परिसरात सकाळी 3 वाजल्यापासून भक्त जमायला सुरुवात झाली आहे. राम मंदिराच काल उद्घाटन झालं. त्यानंतर आज पहिल्याच दिवशी पहाटे राम मंदिर परिसरात भाविकांची प्रचंड गर्दी उसळली आहे. अगदी चेंगराचेंगरी सारखी स्थिती आहे.

