• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

वांगीत प्रेम प्रकरणाच्या संशयावरून मित्राचा खून

Admin by Admin
January 20, 2024
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
वांगीत प्रेम प्रकरणाच्या संशयावरून मित्राचा खून
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

चिंचणी वांगी पोलिसांकडून संशयितास अटक

कडेगाव : तालुक्यातील वांगी येथे आपल्या मैत्रिणीशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून मित्रानेच मित्राचा धारदार कोयत्याने वार करून खून केल्याची घटना घडली आहे. नामदेव प्रल्हाद शिंगे (वय ३०, रा. बेघर वसाहत, नरसिंहपूर ता. वाळवा) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी संशयित अक्षय विष्णू शिंदे (रा. जुळेवाडी ता. कराड, जि. सातारा) याला चिंचणी वांगी पोलिसांनी अटक केली. ही घटना गुरुवार (दि. १८) रात्री वांगी येथे घडली.

संशयित अक्षय शिंदे हा वांगी येथील जवळील एका कारखान्यात कंत्राटी काम करीत आहे. त्याचे गेल्या अनेक दिवसांपासून मैत्रिणीसमवेत प्रेम संबंध होते. ते दोघे वांगी येथील एका खोलीत राहत होते.अक्षय आणि मृत नामदेव यांची मैत्री होती. नामदेव हा अक्षय याच्या खोलीत ये – जा करीत होता. त्यामुळे नामदेव याची अक्षयच्या मैत्रीणीशी ओळख झाली होती. दरम्यान अक्षयला त्याची मैत्रीण व नामदेव यांचे प्रेमप्रकरण सुरू असल्याचा संशय होता. दरम्यान गुरुवारी रात्री अक्षय कारखान्यात कामावर गेला होता. मात्र तो आपले काम अर्धवट सोडून आपल्या खोलीत परतला. यावेळी त्याला मित्र नामदेव आणि त्याची मैत्रीण खोलीत एकत्र असल्याचे आढळून आले. त्यावेळी रागाच्या भरात संशयित अक्षय याने कोयत्याने नामदेव याच्या मानेवर, हनुवटीवर सपासप वार केले. डोक्यात पाच वार केले. त्यामध्ये नामदेव हा गंभीर जखमी झाल्याने रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर कोळसला. यावेळी मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने नामदेव जागीच ठार झाला.

खुनाची माहिती मिळताच चिंचणी-वांगी पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक जाधव यांनी पोलिस पथकासह घटनास्थळी धाव घेतली. संशयित अक्षय शिंदे यांच्या शोधासाठी पोलिस पथके रवाना केली. संशयित अक्षय याला पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. त्याला कडेगाव येथील न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. या घटनेची चिंचणी-वांगी पोलिसांत नोंद झाली आहे. पोलीस अधीक्षक बसवराज तेली अप्पर पोलीस अधिक्षक रितू खोखर मॅडम, उपविभागीय पोलीस अधिकारी पद्मा कदम मॅडम यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक योगेश शेलार, पोलीस अंमलदार हरिदास पवार, नवनाथ रावताळे, प्रकाश मोटे, वैभव गर्जे यांनी तात्काळ तपास करून आरोपीस ताब्यात घेतले.अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक जाधव करीत आहेत.

Previous Post

ब्रेकिंग | सर्वात मोठा बहुमान महाराष्ट्राच्या दाम्पत्याला : अयोध्येतील राम मंदिराच्या लोकार्पणावेळी मोदींसोबत पूजा करणार..!

Next Post

महिला ग्रामपंचायत सदस्याने संपवले जीवन, घराशेजारील विहिरीत घेतली उडी

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
महिला ग्रामपंचायत सदस्याने संपवले जीवन, घराशेजारील विहिरीत घेतली उडी

महिला ग्रामपंचायत सदस्याने संपवले जीवन, घराशेजारील विहिरीत घेतली उडी

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group