• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

ब्रेकिंग | सर्वात मोठा बहुमान महाराष्ट्राच्या दाम्पत्याला : अयोध्येतील राम मंदिराच्या लोकार्पणावेळी मोदींसोबत पूजा करणार..!

अयोध्येतील राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याला उपस्थित राहण्याचा बहुमान देशातील ११ दाम्पत्यांना मिळाला आहे. त्यात नवी मुंबईच्या कांबळे दाम्पत्याचा समावेश आहे.

Admin by Admin
January 19, 2024
in सामाजिक
1 min read
0
ब्रेकिंग | सर्वात मोठा बहुमान महाराष्ट्राच्या दाम्पत्याला : अयोध्येतील राम मंदिराच्या लोकार्पणावेळी मोदींसोबत पूजा करणार..!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई | खबऱ्या ऑनलाईन | १९ जानेवारी २०२४ : अयोध्येत प्रभू श्रीरामांचं मंदिर उभं राहणं हा एक मोठा तप आहे. खूप वर्षांच्या मागणीनंतर रामभक्तांसाठी अभूतपूर्व असं मंदिर वास्तव्यात साकार होत आहे. या मंदिरावर असणारं रेखीव काम, त्याची भव्यदिव्यता, यांची आता इतिहासात नोंद होणार आहे. हे मंदिर आता वर्षानुवर्षे जिवंत राहणार आहे. या ऐतिहासिक भव्य मंदिराचा प्राण प्रतिष्ठापन सोहळा याची देही याची डोळा बघायला मिळणं हे खूप मोठं भाग्य आहे. या सोहळ्याच्या सुरूवातीच्या दिवसांमध्ये सुरू असलेली लगबग, जय्यत तयारी प्रत्यक्ष बघायला मिळणं, ती लगबग अनुभवनं यापेक्षा मोठं भाग्य असूच शकत नाही‌. श्रीराम जेव्हा लंका जिंकून आले तेव्हा अयोध्या जशी झगमगीत झाली होती तशी अयोध्या अनेक युगांनी बघायला मिळणं ही खूप मोठी गोष्ट आहे. अयोध्येच्या राम मंदिराच्या उभारणीला योगदान देणाऱ्या प्रत्येक हातांसाठी ते एक पुण्यकर्म आहे. इतक्या युगांनी ही भव्यदिव्यता अनुभवायला मिळणार आहे. अयोध्येतील श्रीराम मंदिराचं येत्या २२ जानेवारीला लोकार्पण होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत रामलल्लांची प्राण प्रतिष्ठा होणार आहे. या प्राण प्रतिष्ठाच्या सोहळ्यात मोदींसह ११ दाम्पत्य पूजा करणार आहेत. या पूजेचा बहुमान महाराष्ट्रातील एका दाम्पत्याला मिळाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील रामभक्तांकडून आनंद व्यक्त केला जातोय.

अयोध्येतील राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याला उपस्थित राहण्याचा बहुमान देशातील ११ दाम्पत्यांना मिळाला आहे. त्यात नवी मुंबईच्या कांबळे दाम्पत्याचा समावेश आहे. अयोध्येत २२ जानेवारीला श्रीरामल्लांच्या प्राण प्रतिष्ठाच्या सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह प्रभू श्रीरामांची पूजा करण्याचा मान नवी मुंबईतील कांबळे दाम्पत्याला मिळाला आहे. विठ्ठल कांबळे आणि उज्ज्वला कांबळे अशी या पती-पत्नीची नावे आहेत.

Previous Post

पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या.. पहा कोणाची कुठे झालीय बदली..!

Next Post

वांगीत प्रेम प्रकरणाच्या संशयावरून मित्राचा खून

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
वांगीत प्रेम प्रकरणाच्या संशयावरून मित्राचा खून

वांगीत प्रेम प्रकरणाच्या संशयावरून मित्राचा खून

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group