• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सांगली ब्रेकिंग | सावकारी करणाऱ्या महिलेविरोधात  गुन्हा दाखल : व्याजदर वीस टक्के..!

Admin by Admin
January 12, 2024
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, सामाजिक
1 min read
0
पत्नीचा छळ; सहायक पोलीस निरीक्षकासह तिघांविरोधात गुन्हा
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सांगली प्रतिनिधी | खबऱ्या ऑनलाईन – कर्जाची मुद्दलासह परतफेड करूनही आणखी एक लाख रुपयांसाठी रिक्षा चालकाला शिवीगाळ करणाऱ्या खासगी सावकार महिलेविरोधात शहर पोलिसांनी गुन्हा नोंदविला. अलका दत्तात्रय शिकलगार (रा.कोल्हापूर रस्ता, सांगली) असे तिचे नाव आहे. या प्रकरणी दिगंबर प्रभाकर कांबळे (वय ४३, रा. खणभाग, सांगली) यांनी फिर्याद दिली.

पोलिसांनी सांगितले की, कांबळे यांचा रिक्षा चालविण्याचा व्यवसाय आहे. २०१८ मध्ये वडापावच्या व्यवसायासाठी त्यांना पैशांची गरज होती. यासाठी त्यांनी अलका शिकलगार यांच्याकडे ८५ हजार रुपयांची गरज असल्याचे सांगितले. शिकलगार यांनी आठवड्याला २० टक्के व्याजाने पैसे देण्याची तयारी दर्शविली. पण ही रक्कम बिनव्याजी घेतल्याचे करारपत्र करून घेतले. १२ सप्टेंबर २०१८ रोजी ८५ हजार रुपये दिले. या पैशांच्या परतफेडीपोटी कांबळे यांनी शिकलगार यांना वेळोवेळी ८५ हजार रुपये दिले. परतफेड झाली, तरी शिकलगार यांनी आणखी १ लाख ६० हजार रुपयांची मागणी केली. कांबळे परतफेड झाल्याचे सांगितले असता, २० टक्के व्याज आकारणीचा हिशेब सांगितला. ८५ हजार रुपयांचे कर्ज आठवड्याला २० टक्के व्याजदराने दिले आहे, आजअखेर १ लाख ६० हजार रुपये देणे लागते असे सांगितले.

धनादेशाद्वारे पैसे दिले..

ऑगस्ट २०२३ रोजी कांबळे यांनी धनादेशाद्वारे आणखी २० हजार रुपये शिकलगार यांना धनादेशाद्वारे दिले. त्यावेळी शिकलगार यांनी आणखी १ लाख पाच हजार रुपये देणे लागतो असे करारपत्र करून घेतले. व्याजासह मुद्दल परत करूनही अधिकच्या पैशांसाठी कांबळे यांना शिवीगाळ आणि धमकावण्याचा प्रकार सुरु केला. वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून अखेर कांबळे यांनी पोलिसांत धाव घेतली. त्यांच्या फिर्यादीवरून महिला सावकाराविरोधात गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक अभिजीत देशमुख यांनी दिली.

Previous Post

नेवरीत मातंग समाजाचा ग्रामपंचायत कार्यालयावर हलगी मोर्चा

Next Post

पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या.. पहा कोणाची कुठे झालीय बदली..!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
वाहनचालकांकडून पैसे उकळल्याप्रकरणी कर्मचाऱ्याचे निलंबन..!

पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या.. पहा कोणाची कुठे झालीय बदली..!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group