आण्णाभाऊ साठे प्रेमी आक्रमक, तहसीलदारांना निवेदन
कडेगांव:- कडेगांव तालुक्यातील नेवरी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेची विटंबना झाली असून दोषींवर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत कठोर कारवाई करावी याबाबतचे निवेदन डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया यांचे वतीने व सर्व आण्णा भाऊ साठे प्रेमी यांचे वतीने कडेगांव तहसीलदार, गटविकास अधिकारी व पोलीस निरीक्षक यांना देण्यात आले.
निवेदनात म्हंटल आहे, आम्ही सर्व आण्णा भाऊ साठे प्रेमीनी नेवरी ग्रामपंचायत कार्यालयात लावण्यासाठी लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांच्या जयंती दिनी त्यांची एक प्रतिमा सरपंच व उपसरपंच यांच्याकडे भेट दिली होती. आज रोजी आम्ही सर्व आण्णा भाऊ साठे प्रेमींनी ग्रामपंचायत कार्यालयास भेट दिली असता कार्यालयातील इतर महापुरुषांच्या प्रतीमेशेजारी सदर प्रतिमा आम्हाला दिसून आली नाही. याबाबत विचारणा केली असता प्रतिमेची शोध मोहीम सुरू झाली. यावेळी सदर प्रतिमा एका प्लास्टिक गोनीत भरून एका अडगळीच्या ठिकाणी ठेवल्याचे दिसून आले.सदर प्रतिमा आम्ही ग्रामपंचायत कार्यालयात प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी दिलेली असताना ती अशा पद्धतीने आढळून आल्याने सर्व आण्णा भाऊ साठे प्रेमी अतिशय दुःखी आणि संतप्त झाले असून समजातून या कृत्याचा निषेध व्यक्त होत आहे.आमच्या महापुरुषांचा हा अवमान असून ग्रामपंचायत पदाधिकारी व प्रशासनाने जाणीव पूर्वक विटंबना केली आहे अशी सर्व समाजाची भावना आहे .तरी आपण यामध्ये तत्काळ लक्ष घालून सखोल चौकशी करून दोषींवर अनुसुचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदयातुनार कठोर कारवाई करावी अन्यथा सर्व समाज व सामाजिक संघटना रस्त्यावर उतरेल व पुढील होणाऱ्या नुकसानीस सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील.
निवेदनावर डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हा उपाध्यक्ष सयाजी सकट, संजय गांधी निराधार योजना कमितीचे संचालक मनोहर सकट, शुभम सकट,लखन सकट,अभिजित सकट, सत्यवान वायदंडे, उत्तम सकट ,आकाश वाघमारे यांच्या सह्या आहेत.

