• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सांगली ब्रेकिंग | खळबळजनक – झिल इंटरनॅशनल स्कूलमध्ये धक्कादायक प्रकार; विद्यार्थिनीने उचललं टोकाचे पाऊल : उपचारादरम्यान मृत्यू.

Admin by Admin
January 3, 2024
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, शैक्षणिक, सामाजिक
1 min read
0
सांगली ब्रेकिंग | खळबळजनक – झिल इंटरनॅशनल स्कूलमध्ये धक्कादायक प्रकार; विद्यार्थिनीने उचललं टोकाचे पाऊल : उपचारादरम्यान मृत्यू.
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

कुपवाड प्रतिनिधी | खबऱ्या ऑनलाईन – शहराजवळील बामणोली परिसरात असणाऱ्या झिल इंटरनॅशनल स्कूल आणि ज्युनिअर कॉलेजमध्ये इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी घेत एका अल्पवयीन विद्यार्थिनीने आपली जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना घडली. साक्षी रवींद्र जाधव (राहणार मिरज) असं मृत विद्यार्थिनीचे नाव आहे.मंगळवारी सायंकाळी घडलेल्या या घटनेनं शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

गोपनीय खबऱ्याला मिळालेल्या माहितीनुसार, मृत साक्षी कुपवाड हद्दीतील झिल इंटरनॅशनल स्कूल आणि ज्युनिअर कॉलेजमध्ये शिक्षण घेत होती. मंगळवारी सायंकाळी ५ वाजता शाळा सुटल्यानंतर घरी जाण्यासाठी ती शाळेबाहेर आली. साक्षीने आपली स्कूलबॅग शाळेच्या बसमध्ये ठेवली.

त्याच वेळी तिचे पालकही शाळेमध्ये आले होते. ते कॅपसमध्ये हजर होते. यावेळी आपली स्कूल बॅग बसमध्ये ठेवून साक्षी पुन्हा शाळेच्या दिशेने पळाली. दुसऱ्या मजल्यावर जात अंदाजे ४० ते ४५ फूटाच्या अंतरावरून तिने उडी घेतली. या घटनेत साक्षीला गंभीर दुखापत झाली.

घटनेनंतर शाळा प्रशासन अधिकारी आणि पालकांनी तिला उपचारासाठी एका स्थानिक खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान साक्षीचा मृत्यू झाला. दरम्यान, साक्षीने इतकं टोकाचं पाऊल का उचललं. ? याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.

सांगली जिल्ह्यातील शिक्षण संस्था व शिक्षण विभागाला नेमकं काय झालंय..? असा खडा सवाल नागरिक विचारत आहेत. १५ दिवसांपूर्वी कुपवाड मधील नव कृष्णाव्हॅली स्कूलमध्ये शिक्षकाने विद्यार्थ्यांना बेदम मारहाण केल्याने एकच खळबळ उडाली होती. त्या प्रकरणाच्या चर्चेवर पडदा पडतोय तोपर्यंत काल मनसे कार्यकर्त्यांनी शिक्षकाला चोप दिल्याची घटना दुपारीच घडली. आणि आता एका मुलीने चक्क कॉलेजमधील तिसऱ्या मजल्यावरून उडी मारणे म्हणजे खूपच धक्कादायक बाब आहे.

Previous Post

सांगली ब्रेकिंग | विद्यार्थीनींसोबत शिक्षकाचे गैरवर्तन; पालक व मनसे कार्यकर्त्यांकडून चोप

Next Post

‘कोणाचे मन दुखावले असेल तर मी खेद व्यक्त करतो’; लाठीचार्ज प्रकरणावर सत्तारांची प्रतिक्रिया

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
रेल्वेचा दोन दिवस मेगाब्लॉक; काही ट्रेन रद्द : कोल्हापूर-मुंबई कोयना एक्‍सप्रेसचाही समावेश : वाचा सविस्तर

'कोणाचे मन दुखावले असेल तर मी खेद व्यक्त करतो'; लाठीचार्ज प्रकरणावर सत्तारांची प्रतिक्रिया

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group