- रोहन बने यांच्यावर मान्यवरांंकडून शुभेच्छांचा वर्षाव; रोहन दादा यांचे भविष्य उज्वल- खासदार विनायक राऊत यांचे गौरवोद्गार
रत्नागिरी प्रतिनिधी | खबऱ्या ऑनलाईन | शिवसेना ठाकरे गटाचे चिपळूण- संंगमेश्वर विधानसभा संघटक, माजी जि. प. अध्यक्ष व युवानेते रोहन बने यांचा वाढदिवस गुरूवारी रात्री केक कापून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी साडवली येथील पी. एस. बने इंटरनॅशनल स्कूलच्या पटांगणावर अभिष्टचिंतन चिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या अभिष्टचिंतन सोहळ्यात बोलताना अनेक मान्यवरांंकडून रोहन बने यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. यावेळी ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी रोहन बने यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना रोहन बने हे दिलदार व्यक्तिमत्त्व असून त्यांचे भविष्य उज्वल असल्याचे गौरवोद्गार काढले.
युवानेते रोहन बने यांच्या वाढदिवसानिमित्त गुरूवारी रात्री साडवली येथील पी. एस. बने इंटरनॅशनल स्कूलच्या पटांगणावर अभिष्टचिंतन चिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याला अनेक मान्यवर मंडळींनी उपस्थिती लावली होती. या अभिष्टचिंतन सोहळ्यात बोलताना खासदार विनायक राऊत म्हणाले कि, रोहन बने हे शिवसेनेचे युवा नेतृत्व असून रोहन बनेंसारखे युवा नेतृत्व पुढे आले पाहिजे. रोहन बने यांनी राजकारणात अल्पावधीतच मोठी झेप घेतली आहे. त्यांच्या पाठीमागे वडील माजी आमदार सुभाष बने पाठबळ आहे. शिवाय शिवसेना त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. रोहन बने यांचे कार्य निस्वार्थीपणे सुरू असून वडील माजी आमदार सुभाष बने यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांची वाटचाल सुरू आहे. अशीच वाटचाल त्यांनी सुरू ठेवावी आम्ही सर्वजण त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहोत, असे खासदार विनायक राऊत यावेळी म्हणाले.
या अभिष्टचिंतन सोहळ्याप्रसंगी राजापूरचे आमदार राजन साळवी, माजी आमदार सुभाष बने, ठाकरे गटाचे जिल्हा सहसंपर्कप्रमुख राजेंद्र महाडिक, हिंदू रक्षा समिती व धर्मगुरू दशनाम गोस्वामी आखाड्याचे महामंत्री संकेतराज बने, संंगमेश्वर तालुकाप्रमुख बंड्या बोरूकर, चिपळूण तालुकाप्रमुख विनोद झगडे, चिपळूण-संगमेश्वरचे विधानसभा क्षेत्रप्रमुख बाळा कदम, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस सुरेश बने, माजी सभापती जया माने, मुन्ना थरवळ, बाबा दामुष्टे, सुबोध पेडणेकर, राजन मोहिरे, तेजस शिंदे, इस्त्याक कापडी आदिंसह संंगमेश्वर व चिपळूण तालुक्यातील ठाकरे गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सर्वांनी रोहन बने यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. अशाप्रकारे रोहन बने यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

