• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

नेवरीत कौटुंबिक वादातून महिलेचा खून ; पतीची प्रकृती गंभीर

Admin by Admin
December 31, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, सामाजिक
1 min read
0
Crime: किरकोळ वादातून तरुणाची हत्या; रहिवाशांनी केली पोलिसांवर दगडफेक!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

  • सासू,दिर जावेसह चौघेजण ताब्यात

कडेगांव: तालुक्यातील नेवरी येथे महिलेचे डोके दगडाने ठेचून ,गळ्यावर, डोक्यात धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला आहे.महिलेचा पती व चुलत दिरावरही वार केल्याने तेही गंभीर जखमी झाले. प्रियांका अजय महाडीक (वय २५) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. अजय आप्पासाहेब महाडीक (३०) व नवनाथ बाबूराव महाडीक (४५) अशी जखमींची नावे आहेत. ही घटना शनिवारी सायंकाळी घडली. अजय यास विटा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबत कडेगाव पोलिसात नोंद झाली आहे.याप्रकरणी महिलेची सासू तारामती आप्पासाहेब महाडीक, दीर शरद आप्पासाहेब महाडीक, जाऊ उज्ज्वला शरद महाडीक, पुतण्या अभिषेक शरद महाडीक या संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

नेवरी येथे शेडवस्तीनजीक महाडीक कुटुंब राहते. शरद व अजय हे सख्खे भाऊ आहेत. शरदचा मुंबई येथे रिक्षाचा व्यवसाय आहे. तो पंधरा दिवसांपूर्वी नेवरी येथे आला आहे शनिवारी सायंकाळी दोन्ही कुटुंबात भांडण सुरू झाले. रागाच्या भरात दीर शरद आणि पुतण्या अभिषेक याने धारदार शस्त्राने प्रियांकाच्या डोक्यावर व गळ्यावर तसेच तिचा पती अजयच्याही डोक्यावर वार केले त्यामुळे प्रियांकाचा जागीच मृत्यू झाला, तर भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या मयत महिलेचा चुलत दीर नवनाथ महाडीक जखमी झाला. त्यास स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

Previous Post

बदली, कंत्राटी कामगारांना कायम करण्याचा फेरप्रस्ताव द्या – पालकमंत्री डॉ.सुरेश खाडे

Next Post

जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष, शिवसेना ठाकरे गटाचे युवानेते रोहनदादा बने यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष, शिवसेना ठाकरे गटाचे युवानेते रोहनदादा बने यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा

जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष, शिवसेना ठाकरे गटाचे युवानेते रोहनदादा बने यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group