• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

Crime | कवठेमहांकाळमध्ये सराफ दुकान फोडले, रोख रकमेसह पावणेतीन लाखांचा ऐवज लंपास

Admin by Admin
December 22, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, सामाजिक
1 min read
0
Crime | कवठेमहांकाळमध्ये सराफ दुकान फोडले, रोख रकमेसह पावणेतीन लाखांचा ऐवज लंपास
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

कवठेमहांकाळ प्रतिनिधी | खबऱ्या ऑनलाईन :- कवठेमहांकाळ येथील मल्लिकार्जुन मंदिराजवळ असलेले सराफ दुकान शुक्रवारी पहाटे अज्ञात चोरट्यांनी लुटले. दुकानातील राेख रकमेसह साेन्या-चांदीचे दागिने असा २ लाख ७२ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.

याप्रकरणी सराफ व्यावसायिक योगेश भुपाल जंगम (वय ३८, रा. जत रोड आयटीआय कॉलेजच्या पाठीमागे कवठेमहांकाळ) यांनी कवठेमहांकाळ पोलिसात फिर्याद दिली आहे.

कवठेमहांकाळ येथे मल्लिकार्जुन मंदिराजवळ याेगेश जंगम यांचे यश ज्वेलर्स नावाचे सराफी दुकान आहे. दुकानात त्यांनी अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा बसवली आहे. गुरुवार दि. २१ रोजी रात्री ८ वाजता नेहमीप्रमाणे दुकान बंद करून जंगम घरी गेले. शुक्रवार दि. २२ रोजी पहाटे २ वाजून २७ मिनिटांनी जंगम यांच्या मोबाईलवर दुकानातील कुलपाशी छेडछाड हाेत असल्याचा गजर वाजू लागला. लगेचच ते माेटारीतून दुकानाकडे आले. यावेळी दुकानाचे लाेखंडी शटर अर्धवट उघडे व आतील कुलूप तुटलेले दिसले. दुकानात चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.

तत्काळ त्यांनी कवठेमहांकाळ पाेलिसांशी संपर्क साधला. कवठेमहांकाळ पोलिसही काही क्षणातच घटनास्थळी पाेहाेचले. दुकानात जाऊन पाहिले असता विक्रीस ठेवलेले चांदीचे दागिने, बेन्टेक्सचे दागिने, सोन्याची मोड व सात हजार रुपये रोख तसेच सीसीटीव्हीचे डीव्हीआर मशीन गायब हाेते. दीड लाख किमतीचे तीन किलो चांदीचे तयार दागिने, एक लाख किमतीची २५ ग्रॅम वजनाची सोन्याची मोड, दहा हजारांचे बेन्टेक्सचे दागिने, सात हजारांची रोकड व पाच हजार रुपये किमतीचे सीसीटीव्हीचे डीव्हीआर मशीन असा २ लाख ७२ हजारांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला.

घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधीक्षक सुनील साळुंखे, पोलिस निरीक्षक जोतिराम पाटील यांनी पाहणी केली. श्वानपथकाच्या मदतीने चाेरट्यांचा माग काढण्यात आला. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक रविराज जमादार करीत आहेत.

https://youtube.com/@GopniyKhabaryaLive?si=_kqFrokLxezr2Yi1

Previous Post

ऑक्सिजन बेड सज्ज ठेवा, लसीकरण सुरू करा : मुख्यमंत्री

Next Post

ब्रेकिंग न्यूज! मनोज जरांगे पाटील यांची तब्येत पुन्हा खालावली

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
ब्रेकिंग न्यूज! मनोज जरांगे पाटील यांची तब्येत पुन्हा खालावली

ब्रेकिंग न्यूज! मनोज जरांगे पाटील यांची तब्येत पुन्हा खालावली

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group