• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

ऑक्सिजन बेड सज्ज ठेवा, लसीकरण सुरू करा : मुख्यमंत्री

Admin by Admin
December 22, 2023
in मंत्रालय, सामाजिक
1 min read
0
ऑक्सिजन बेड सज्ज ठेवा, लसीकरण सुरू करा : मुख्यमंत्री
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई प्रतिनिधी | खबऱ्या ऑनलाईन – ‘जेएन-वन’ हा कोरोनाचा नवा व्हेरिएंट आढळल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी आरोग्य यंत्रणा, जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेऊन सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या.

रुग्णालयांमध्ये विलगीकरण आणि ऑक्सिजन बेडस् यांची यंत्रणा सज्ज ठेवावी. नागरिकांनी घाबरून न जाता कोरोना प्रतिबंधात्मक सूचनांचे पालन करावे, यंत्रणा सज्ज असल्याची ग्वाही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.

मुख्यमंत्र्यांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून बैठक घेतली. आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, मुख्य सचिव मनोज सैनिक, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव भूषण गगराणी, प्रधान सचिव विकास खारगे, प्रधान सचिव ब्रिजेश सिंह, आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आदी सहभागी झाले होते.

  • राज्यात ६३ हजार विलगीकरण बेड्स..

सध्या राज्यात ६३ हजार विलगीकरण बेड्स, ३३ हजार ऑक्सिजन बेड्स, ९ हजार ५०० आयसीयू बेड्स व सहा हजार व्हेंटिलेटर बेड्स
उपलब्ध आहेत.

ऑक्सिजन प्लँट्स, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन पाइपलाइन्स, आरटीपीसीआर लॅब सुस्थितीत आहेत का, याची तपासणी करावी. लसीकरणाच्या दृष्टीने तयारी ठेवण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.

Previous Post

जिवंत काडतुसासह पाच अग्निशस्त्रे जप्त, तरुणाला अटक

Next Post

Crime | कवठेमहांकाळमध्ये सराफ दुकान फोडले, रोख रकमेसह पावणेतीन लाखांचा ऐवज लंपास

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
Crime | कवठेमहांकाळमध्ये सराफ दुकान फोडले, रोख रकमेसह पावणेतीन लाखांचा ऐवज लंपास

Crime | कवठेमहांकाळमध्ये सराफ दुकान फोडले, रोख रकमेसह पावणेतीन लाखांचा ऐवज लंपास

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group