• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सांगली | वाळू माफियांनी आत्तापर्यंत तहसीलदार, तलाठी, पोलीस, पत्रकार सर्वांना दहशत दाखवली..! आता पोलीस पाटलांना निबार चोपले..! तरीही महसूल प्रशासनाची भूमिका षंडच.?

Admin by Admin
December 20, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, सामाजिक
1 min read
0
सांगली | खासगी सावकाराची पिता-पुत्रास मारहाण, दहा लाखांसाठी साडेबारा लाखांची पठाणी वसुली
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

  • पांढरेवाडीतील अवैध वाळू वाहतूक रोखल्याने पोलीस पाटील यांना मारहाण; चौघांवर गुन्हा दाखल

जत पूर्व भागातील पांढरेवाडी गावातील ओढापात्रातील अवैध वाळू वाहतुकीची अप्पर तहसिलदारांना माहिती देणाऱ्या पोलीस पाटिला मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना सोमवारी (दि. १८) सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास दरीबडची-संख रस्त्यावर घडली. याबाबतची फिर्याद पांढरेवाडीचे पोलीस पाटील धर्मराज बाळाप्पा शिंदे यांनी दिली. पोलिसांनी सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी श्रीमंत कामा करपे, मल्हारी जयाप्पा करपे, जयाप्पा कामा करपे, महादेव बाबू तांबे सर्व (रा. पांढरेवाडी ता. जत) यांच्यावर गुन्हा दाखल केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, संखचे अप्पर तहसीलदार सुधाकर मागाडे यांनी पोलीस पाटील शिंदे यांना अवैध वाळू उत्खनन संदर्भात अप्पर कार्यालयाला माहिती द्यावी. अश्या सूचना दिल्या होत्या. दरम्यान सोमवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास पांढरेवाडी हद्दीतील दरीबडचीकडे जाणाऱ्या ओढ्यामध्ये अवैध वाळू उपसा सुरू असल्याचे समजले. या ठिकाणी पोलीस पाटील धर्मराज शिंदे गेले असता त्यांना ट्रॅक्टरचा आवाज आला .यावेळी याबाबतची माहिती सांगण्यासाठी अप्पर तहसीलदार सुधाकर मागाडे यांना फोन करत होते.परंतु याचवेळी एका बोलेरो गाडीतून श्रीमंत करपे, मल्हारी करपे, जायाप्पा करपे, महादेव तांबे आले व अगोदर पण म तहसील कार्यालयाला माहिती दिल्याने आमचे नुकसान झाले आहे. आता फोन लावायचा नाही म्हणून अप्पर तहसीलदार यांना फोन लावू दिला नाही. एकंदरीत त्यांच्याकडून सरकारी कामात अडथळा आणल्याचे कृत्य झाले आहे.

ओढ्यामध्ये आमचाच ट्रॅक्टर आहे. याबाबत तहसिलदार साहेबांना कळवू नका. असे सांगत श्रीमंत करपे त्यांच्या सहकारी यांनी गाडीतून आणलेल्या काट्याने मारहाण करत जखमी केले आहे व तसेच भविष्यात अशी माहिती पोलिसात दिल्या जीवे मारण्याची धमकी दिली आहे. या घटनेचा अधिक तपास उमदी पोलीस करत आहेत.

Previous Post

मौजे डिग्रजच्या शेतकर्‍यास ११ लाख रुपयांचा गंडा

Next Post

पुणे हादरलं ! अल्पवयीन कर्णबधिर बहिणीवर भावासह तिघांकडून बलात्कार..

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
ब्रेकिंग | 🔥अवैध वाळू वाहतुकीवर कारवाईसाठी गेलेल्या तलाठ्याला चिरडलं, घटनेत तलाठी गंभीर जखमी..

पुणे हादरलं ! अल्पवयीन कर्णबधिर बहिणीवर भावासह तिघांकडून बलात्कार..

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group