• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सांगली जिल्ह्यातील २५ हजार कर्मचारी संपावर : जुन्या पेन्शनसाठी बेमुदत संप

Admin by Admin
December 14, 2023
in पश्चिम महाराष्ट्र, सामाजिक
1 min read
0
सांगली जिल्ह्यातील २५ हजार कर्मचारी संपावर : जुन्या पेन्शनसाठी बेमुदत संप
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सांगली प्रतिनिधी | खबऱ्या ऑनलाईन –जुनी पेन्शनसह अन्य मागण्यांसाठी शासकीय आणि निमशासकीय कार्यालयातील वर्ग तीन-चारच्या कर्मचाऱ्यांनी गुरुवारपासून बेमुदत संप सुरू केला आहे. याला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने शासकीय कामे ठप्प झाली.

अधिकाऱ्यांनी रजा टाकून आंदोलनास पाठींबा दिला आहे. जिल्ह्यातील २५ हजारांवर शिक्षक, कर्मचारी संपात सहभागी झाल्याचा संघटनांनी दावा केला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून धरणे आंदोलन सुरू केले असून, शासनाच्या निषेधाच्या जोरदार घोषणा दिल्या जात होत्या.

याबाबत माहिती अशी की, शासकीय आणि निमशासकीय कार्यालयातील वर्ग तीन आणि चारच्या कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शन योजना लागू करावी, ही मागणी अनेक वर्षांपासून आहे. तरीही शासनाकडून डोळेझाक होत आहे. यासाठी गुरुवारपासून राज्यभरात बेमुदत संप सुरू करण्यात आला आहे. त्याचबरोबर या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांही करण्यात आलेल्या आहेत.

जिल्ह्यातील शासकीय, निमशासकीय कार्यालयातील वर्ग तीन आणि चारचे कर्मचारी बेमुदत संपात सहभागी झाले आहेत. तसेच शिक्षकांचाही या संपात समावेश आहे. सुमारे २५ हजारांहून अधिक शिक्षक, कर्मचारी सहभागी आहेत. यामुळे शासकीय आणि निमशासकीय कार्यालयातील कामकाजावर परिणाम झाला आहे. कामासाठी आलेल्या नागरिकांना माघारी जावे लागले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात शुकशुकाट

जिल्हाधिकारी कार्यालयातील बहुतांशी कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत. त्यांना पाठिंबा देण्यासाठी अधिकाऱ्यांनीही सामूहिक रजा टाकली आहे. तर काही संघटनांनी संपाला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे काही कार्यालयात एखादा-दुसरा कर्मचारी काम करताना दिसून आला. तरीही दिवसभर जिल्हाधिकारी कार्यालयात शुकशुकाट दिसून आला. बहुतांशी कार्यालयांना टाळा लावला होता. तसेच संपाची माहिती असल्याने नागरिकही कमी प्रमाणात दिसून आले.

Previous Post

आटपाडी ब्रेकिंग | ओबीसींचा आरक्षण बचाव मोर्चा, ‘इमर्जन्सी” वगळता सर्व व्यवहार बंद

Next Post

ब्रेकिंग | “या’ कारणासाठी जतमध्ये रास्ता रोको, दीड तास वाहतूक ठप्प

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
ब्रेकिंग | “या’ कारणासाठी जतमध्ये रास्ता रोको, दीड तास वाहतूक ठप्प

ब्रेकिंग | "या' कारणासाठी जतमध्ये रास्ता रोको, दीड तास वाहतूक ठप्प

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group