• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सांगली | जेलच्या भिंतीवर सहा फुट तारेचे कम्पाउंड : त्यात सोडला ‘करंट’ ; हालचाल झाली की वाजणार ‘अलार्म’..! वाचा सविस्तर

Admin by Admin
December 14, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, सामाजिक
1 min read
0
सांगली | खासगी सावकाराची पिता-पुत्रास मारहाण, दहा लाखांसाठी साडेबारा लाखांची पठाणी वसुली
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सांगली प्रतिनिधी | खबऱ्या ऑनलाईन | सांगलीतील ब्रिटिशकालीन जिल्हा कारागृहाच्या तटबंदीवरून गतवर्षी आणि नुकतेच कैदी पळाल्याचा प्रकार घडला. त्यामुळे कारागृहाची सुरक्षा पुन्हा ऐरणीवर आली. आता शेवटचा उपाय म्हणून तटबंदीवर उभारलेल्या सहा फुटांच्या तारेच्या ‘वाय’ आकारातील कम्पाउंडच्या तारांमधून विजेचा प्रवाह खेळता ठेवला आहे.

त्यामुळे कैद्याने पलायनाचा प्रयत्न केल्यास ‘करंट’ लागू शकतो. तसेच तत्काळ ‘अलार्म सिस्टीम’मधून भोंगाही वाजू लागेल.

गतवर्षी जुलै २०२२ मध्ये तासगावच्या खुनातील संशयित सुनील ज्ञानेश्वर राठोड (रा. यळगूड, ता. सिंदगी) हा तटबंदीवरून उडी मारून पळाला, तर गत महिन्यात ‘पोक्सो’च्या गुन्ह्यातील सदाशिव अशोक सनदे (२५, मिसाळवाडी, आष्टा) हा पटवर्धन हायस्कूलच्या बाजूने पळाला. त्यामुळे कारागृहाची सुरक्षा धोक्यात असल्याचा इशारा मिळाला. या घटनेपूर्वी गांजा, दारू, मोबाइल तटबंदीवरून आतमध्ये टाकण्यात आल्याचे उघडकीस आले आहे.

कारागृहाभोवती गेल्या काही वर्षात शाळा, अपार्टमेंट व नागरी वस्ती झाली आहे. नागरिकांच्या घरावर चढून आतमध्ये मटणाची पाकिटे टाकल्याचा प्रकारही पूर्वी घडला होता. त्यामुळे सुरक्षा व्यवस्था कडक केली आहे. तटबंदीवर जवळपास सहा फुटांचे तारेचे कम्पाउंड असून, त्यामध्ये विजेचा प्रवाह सोडला आहे तसेच आतमध्ये धोक्याच्या ठिकाणी पत्रे मारले आहेत.

  • खुनातील १९६ संशयित – जिल्हा कारागृहात एक वर्षाच्या आतील शिक्षा लागलेल्या कैद्यांना ठेवले जाते, तसेच गंभीर गुन्ह्यात जामीन न झालेले कच्चे कैदीही येथे ठेवले जातात. खुनाचा आरोप असलेले १९६ संशयित सध्या कारागृहात आहेत. त्यामध्ये तीन महिलांचाही समावेश आहे.

कैदी क्षमता २३५ सध्या ४००

सांगलीच्या कारागृहात पुरुष कैद्यांची क्षमता २०५, तर स्त्रियांची क्षमता ३० इतकी आहे. २३५ क्षमतेच्या कारागृहात सद्य:स्थितीत ४०० कैदी आहेत. क्षमतेपेक्षा जास्त कैदी असल्यामुळे कारागृह प्रशासनावर ताण येतो. जिल्ह्यातील इतर १०० हून अधिक कैदी कळंबा कारागृहात आहेत.

  • कारागृहातील बंदींची संख्या पाहता मनुष्यबळ अपुरे पडते. कैदी पलायनाचे तसेच इतर गैरप्रकार घडू नयेत म्हणून तटबंदीच्या वरती उभारलेल्या तारेच्या कम्पाउंडमधून विजेचा प्रवाह खेळता ठेवला आहे. –विवेक झेंडे, कारागृह अधीक्षक, सांगली
Previous Post

ब्रेकिंग | सोलापुरात महसूल, झेडपीचे कामकाज बंद; जुनी पेन्शनची मागणी

Next Post

ब्रेकिंग | सांगलीसाठी जयंत पाटलांनी अधिवेशनात केली ‘ही” मागणी..

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
ब्रेकिंग | सांगलीसाठी जयंत पाटलांनी अधिवेशनात केली ‘ही” मागणी..

ब्रेकिंग | सांगलीसाठी जयंत पाटलांनी अधिवेशनात केली 'ही" मागणी..

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group