• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

ब्रेकिंग | सांगलीसाठी जयंत पाटलांनी अधिवेशनात केली ‘ही” मागणी..

कोयना धरणाचे पाणी कृष्णा नदीत सोडण्याची जयंत पाटलांची मागणी

Admin by Admin
December 14, 2023
in पश्चिम महाराष्ट्र, राजकीय, सामाजिक
1 min read
0
ब्रेकिंग | सांगलीसाठी जयंत पाटलांनी अधिवेशनात केली ‘ही” मागणी..
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

नागपूर प्रतिनिधी | खबऱ्या ऑनलाईन | अधिवेशन विशेष – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज (ता. 14 डिसेंबर) कोयना धरणाच्या पाण्याचा मुद्दा सभागृहात लक्षवेधी सूचनेद्वारे उपस्थित केला. यावेळी सांगली जिल्ह्यातील भीषण पाणीटंचाईवर सभागृहाचे लक्ष वेधत असताना कोयना धरणाचे पाणी लवकरात लवकर कृष्णा नदीत सोडण्यात यावे, अशी मागणी जयंत पाटील यांच्याकडून करण्यात आली आहे.

याबाबत सविस्तर बोलताना जयंत पाटील म्हणाले की, कोयनेतून पाणी कमी आल्याने कृष्णा नदी कोरडी पडली आहे. त्यामुळे ताकारी आणि अन्य उपसा सिंचन योजनेचे पंप बंद करण्यात आले आहेत. जिल्ह्याचे हक्काचे 32 टीएमसी पाणी उपलब्ध करून देणे व कृष्णा नदी कोरडी न पडू देणे याची काळजी शासनाने घेतली पाहिजे.

जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी विविध विधाने करत आहेत. खासदारांनी तर राजीनामा देतो असे विधान केले होते. या विविध विधानांमुळे, राजकीय दबावामुळे पाणी सोडले जात नाही असा समज झाला. सातारा आणि सांगली जिल्ह्यातील पालकमंत्र्यांचे समन्वय नाही किंवा संवाद नाही असे दिसून आले आहे असे म्हणत त्यांनी कोयना धरणाच्या पाण्यावरून सुरू असलेल्या राजकारणावरही जयंत पाटील यांच्याकडून टोला लगावण्यात आला आहे.

तर, 2 आणि 3 टीएमसी पाण्यासाठी 32 टीएमसी पाण्यावर अन्याय करणे योग्य नाही. धरणात पाणीच नाही अशी परिस्थिती नाही. ताकारी, टेंभू, म्हैसाळ योजनेतून या खानापूर, आटपाडी, तासगाव, कवठेमहांकाळ, जत या भागात पाणी जाते. या काळात पाणी दिले तर उन्हाळ्यात त्रास होत नाही. पाणी सोडले तर या दुष्काळी भागावर अन्याय होणार नाही. तसेच कृष्णा नदीत पाणीसाठा राहील असे सांगत असतानाच एप्रिल – मे मध्ये आमच्या जिल्ह्यात पाण्याचा प्रचंड ताण येतो. याच काळात कोकणात वीजनिर्मितीसाठी पाणी सोडले जाते. वीजनिर्मिती थोडीशी कमी करून पाणी जिल्ह्याला डायव्हर्ट करावे अशी मागणी जयंत पाटील यांनी सभागृहात केली. त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

Previous Post

सांगली | जेलच्या भिंतीवर सहा फुट तारेचे कम्पाउंड : त्यात सोडला ‘करंट’ ; हालचाल झाली की वाजणार ‘अलार्म’..! वाचा सविस्तर

Next Post

जत तालुक्याचे त्रिभाजन करा ; आ. विक्रम सावंत यांची अधिवेशनात मागणी

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
जत तालुक्याचे त्रिभाजन करा ; आ. विक्रम सावंत यांची अधिवेशनात मागणी

जत तालुक्याचे त्रिभाजन करा ; आ. विक्रम सावंत यांची अधिवेशनात मागणी

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group