- अध्यक्ष हरिश्चंद्र जाधव तर विशाल जकाते यांच्याकडे सचिव पदाची जबाबदारी..!
सांगोला प्रतिनिधी | विकास गंगणे | खबऱ्या ऑनलाईन – सांगोला तालुका तलाठी संघाची नूतन कार्यकारिणी बुधवारी (दि.१३) रोजी जाहिर करण्यात आली. यामधे नूतन अध्यक्षपदी हरिश्चंद्र जाधव तर सचिव विशाल जकाते आदींची निवड करण्यात आली आहे.
यासह कार्याध्यक्षपदी किरण बाडीवाले, उपाध्यक्षपदी गणेश भुजबळ, श्रीम. जयश्री कल्लाळे, खजिनदारपदी प्रसन्नजीत कांबळे , सह सचिवपदी संभाजी जाधव , हिशोब तपासनीसपदी समाधान वगरे, सावापा लांडगे, नितीन इंगोले , संघटकपदी औदुंबर लिगाडे, बाळासाहेब शिंदे, योगेश बोदमवाड आदींची निवड करण्यात आली आहे.
तलाठी संघाच्या सल्लागारपदी सुनील जाधव, उमेश सूर्यवंशी, विनोद भडंगे, गणेश तिके, विजया नाईक, उल्हास पोलके, प्रशांत जाधव तर विशेष निमंत्रित म्हणून योगिता खटाळ, दिपा गुप्ता, अपर्णा मोरे, वैशाली गायकवाड, निलोफर मुजावर, राजेंद्र शिर्के , गणेश तनमोर यांची निवड करण्यात आली आहे.

