राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे ( Dhananjay Munde ) यांना रात्री हृदयविकाराचा सौम्य झटका ( Dhananjay Munde Suffered Mild Heart Attack ) आला आहे. त्यांना तातडीने ब्रिज कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
मुंडे यांची तब्येत बिघडल्याचे वृत्त कळताच आरोग्य मंत्री राजेश टोपे ( Health Minister Rajesh Tope ) यांनी ब्रिच कँडी रुग्णालयात जात मुंडे यांच्या प्रकृतीबाबत माहिती घेतली.
– राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे ( Dhananjay Munde ) यांना रात्री हृदयविकाराचा सौम्य झटका ( Dhananjay Munde Suffered Mild Heart Attack ) आला आहे. त्यांना तातडीने ब्रिज कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मुंडे यांची तब्येत बिघडल्याचे ( Dhananjay Munde health) वृत्त कळताच आरोग्य मंत्री राजेश टोपे ( Health Minister Rajesh Tope ) यांनी ब्रिच कँडी रुग्णालयात जात मुंडे यांच्या प्रकृतीबाबत माहिती घेतली.
कार्यकत्यांची ब्रिच कँडी रुग्णालयात धाव – धनंजय मुंडे यांना हृदयविकाराचा सौम्य झटका आला असून त्यांना धोका नसल्याचे त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे. या घटनेची माहिती मिळताच ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये नेतेमंडळींनी धनंजय मुंडे यांना पाहण्यासाठी रुग्णालयात धाव घेतली. मुंडे हे कार्यकर्तेप्रिय नेते असल्याने अनेक कार्यकर्त्यांनी देखील ब्रिच कँडी रुग्णालयात धाव घेतली.
Maharashtra's Social Justice Minister and NCP leader
Dhananjay Munde admitted to Breach Candy Hospital in Mumbai after he suffered a minor heart attack.(File Pic) pic.twitter.com/y5y9k99VW1
— ANI (@ANI) April 12, 2022
काळजीचे कारण नाही – आरोग्यमंत्री – मंत्री धनंजय मुंडे यांची प्रकृती पूर्ण स्थिर असून काळजी करण्यातचे काहीच कारण नाही, त्यांच्या सर्व आवश्यक तपासण्या झाल्या असून सर्वकाही ठीक आहे, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी धनंजय मुंडे यांची भेट घेतल्यानंतर माहिती देताना सांगितले. मुंडे काल परभणीला गेले होते. त्यानंतर आज त्यांचा जनता दरबार होता. कामाच्या ताणामुळे असे होऊ शकते, असे आरोग्यमंत्री टोपे म्हणाले. पुढील सात दिवस त्यांना रुग्णालयात ठेवण्यात येणार असल्याचेही टोपेंनी सांगितले. त्याच्यावर रुग्णालयात डॉ. समाधानी हे नजर ठेऊन आहेत असेही ते म्हणाले.
मुंडेना आरामाचा सल्ला – धनंजय मुंडे हे सध्या 46 वर्षाचे आहेत. राज्य सरकारमधील एक धडाडीचे मंत्री आणि वक्ते म्हणून धनंजय मुंडे यांची ओळख आहे. धनंजय मुंडे हे भाजपाच्या पंकजा मुंडे यांना कडवी झुंज देत परळी मतदारसंघातून विजयी झालेले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय नेत्यांपैकी ते एक आहेत. धनंजय मुंडे यांना हृदयविकाराचा झटका आल्यामुळे सर्वांना धक्का बसला आहे. त्यांची सध्या प्रकृती ठिक असून त्यांच्या डॉक्टरांनी सात दिवस आराम करण्याचा सल्ला दिला आहे.

