• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

इस्लामपूर | पैशांच्या वादातून डोक्यात दगड घालून मित्राचा खून.

Admin by Admin
April 12, 2022
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
इस्लामपूर | पैशांच्या वादातून डोक्यात दगड घालून मित्राचा खून.
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

इस्लामपूर : खबऱ्या प्रतिनिधी : बहे (ता. वाळवा) येथील खुनी हल्ल्यातील जखमी सचिन तानाजी पाटील (वय ३४, रा. बहे) याचा उपचारादरम्यान आज (मंगळवार) मृत्यू झाला.

जखमी सचिनवर कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. सोमवारी दुपारी पैशाच्या देवघेवीच्या वादातून सचिनच्या मित्राने त्याच्या डोक्यात दगड घातला होता. याप्रकरणी सुनील अनुसे (रा. हुबालवाडी) यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. या प्रकरणी संशयित लाला उर्फ विशाल विजय भोसले (वय ३२, रा. बहे) याच्यावर इस्लामपूर पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा नोंद करून त्याला अटक करण्यात आली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, सोमवारी दुपारी १२.३० च्या सुमारास सुनील अनुसे, महेश घबक, सचिन पाटील, विशाल भोसले हे बहे येथील शाळेच्या परिसरात गप्पा मारत बसले होते. त्यावेळी विशाल हा सचिन याला म्हणाला, ‘ माझा पैशाचा व्यवहार गोडीत मिटव, नाहीतर मी तुला एके दिवशी बघून घेईन.’ ‘मी तुला एकदा सांगितले ना, व्यवहाराप्रमाणे तुला पैसे देतो, जास्त मागशील तर देणार नाही’ असे म्हणत सचिन याने विशाल याच्याशी वाद घातला.

तेथे असणाऱ्या मित्रांनी दोघांचा वाद मिटविला. त्यानंतर विशाल भोसले हा मोटारसायकलवरून निघून गेला. सुनील, महेश, सचिन हे शाळेच्या व्हऱ्यांड्यामध्ये झोपले होते. सुनील याला फरशीवर जोरात काहीतरी आदळल्याचा आवाज ऐकू आला. विशाल याने मोठा दगड उचलून सचिन पाटील याच्या डोक्यात मारला होता. सचिन रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे सुनील याला दिसले. त्यांनी धाव घेत महेश, सुनील यांनी विशाल याला जोरात ढकलून दिले. त्याच्या हातातील दगड बाजूला पडला. जखमी सचिन याला कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मंगळवारी त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Previous Post

राज ठाकरे नेमकं काय म्हणाले ..?

Next Post

मंत्री धनंजय मुंडे यांना हृदयविकाराचा सौम्य झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल..

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मंत्री धनंजय मुंडे यांना हृदयविकाराचा सौम्य झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल..

मंत्री धनंजय मुंडे यांना हृदयविकाराचा सौम्य झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल..

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group